गावगाथा

ठळक बातम्या

बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

अक्कलकोट : तालुक्यातील बासलेगाव येथे श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा डॉ. श्री शिवाचार्यरत्न जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह संपन्न होणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.

➤ बुधवार, ३ डिसेंबर
पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजता श्री लक्ष्मी मंदिर येथून देवीच्या डोंगराकडे मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री भजन, जागरण व पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या चरणी भक्तिमय कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप होईल.

➤ गुरुवार, ४ डिसेंबर
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता रोगरावरील श्री जगदंबा मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गांवरून जलकुंभ सुहासिनींसह देवी मूर्तीची दिमाखदार मिरवणूक पार पडेल. दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास सुरुवात होईल. रात्री भजन, पारंपरिक ढोलवादनासह जागरण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

➤ शुक्रवार, ५ डिसेंबर
शेवटच्या दिवशी पहाटे ४ वाजता मूर्तीच्या मुख्य प्राणप्रतिष्ठापना विधीला सुरुवात होईल. सकाळी ८ वाजता गावातील विहिरीपासून मंदिरापर्यंत जलकुंभ व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता मंदिराच्या गर्भगृहात श्री जगदंबा देवी मूर्तीची प्रतिष्ठापना विधी संपन्न होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या भव्य सोहळ्याचा लाभ बासलेगाव व पंचक्रोशीतील सर्व श्रद्धावान भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ मंडळ, बासलेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.