शैक्षणिक घडामोडी

सिद्राम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी अशोक सपाटे, शिवाजी शिंदे, निवृत्ती कावळे, चंद्रकांत जावळे, महेश मोटे, दिलीप इंगोले, राम कांबळे, चंद्रशेखर हंगरगे, रूपाली शिंदे व अन्य सत्कारमूर्ती

सिद्राम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
मुरुम, ता. उमरगा,(प्रतिनिधी) : शहर व परिसरातील विविध प्रशालेतील दहावी व बारावीच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात शनिवारी (ता. १७) रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. कै. सिद्राम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ मुरूमचे सुपुत्र तथा हिमाचल प्रदेशात वस्त्रउद्योग मंत्रालयात कार्यरत असणारे अभियंता शिवाजी सिद्राम शिंदे व विजयकुमार शिंदे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार इंगळे, ब्युरो ऑफ इंडिया स्टॅण्डर्डचे माजी संचालक निवृत्ती कावळे, देवणीच्या रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, प्राचार्य दिलीप इंगोले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, धम्मचारी धम्मभुषण राम कांबळे, ऑडिटर शिवराज मिटकरी, बीएसएफचे निरीक्षक लक्ष्मण शिंदे, गुंजोटीचे दत्ता कटकधोंड, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक खंडू शिंदे, मुख्याध्यापक नुरमहमद घाटवाले, रुपाली शिंदे, डॉ. संगीता हंगरगे, प्रमोद कुलकर्णी, कांत खुणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि पवनकुमार इंगळे यांनी कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचाराच्या घटना यावर प्रकाश टाकताना युवकांनी भविष्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये येण्याचे आव्हान केले. यावेळी प्राचार्य चंद्रकांत जावळे, प्राचार्य डी. टी. हिंगोले, प्रा. डॉ. महेश मोटे, धम्मचारी राम कांबळे, निवृत्ती कावळे, लक्ष्मण शिंदे, खंडू शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. अशोक सपाटे म्हणाले की, अशा सामाजिक उपक्रमामुळे निश्चितच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन एक आदर्श नागरिक निर्माण होऊ शकतात. ही सामाजिक बांधिलकी शिंदे परिवारांनी जोपासली हे कौतुकास्पद असल्याचे शेवटी ते म्हणाले. कार्यक्रमाकरिता तात्याराव शिंदे, वसंत शिंदे, राजेंद्र कटके, सचिन शिंदे, धनराज शिंदे, वैभव कटके, रेवन कटके, ज्योती शिंदे, कोंडीबा कावळे, गिरजाप्पा कावळे, श्रावण चौगुले, हणमंत कटके, सुलभा कटके, लता शिंदे, राजू शिंदे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार ज्योतीराम शिंदे यांनी मानले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील कन्या प्रशालेच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी अशोक सपाटे, शिवाजी शिंदे, निवृत्ती कावळे, चंद्रकांत जावळे, महेश मोटे, दिलीप इंगोले, राम कांबळे, चंद्रशेखर हंगरगे, रूपाली शिंदे व अन्य सत्कारमूर्ती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button