एक तास स्वच्छतेसाठी व स्वतःसाठी
पुरुषोत्तम व्हीला सोसायटीचा उपक्रम
सोलापूर, ता:०७ सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर पुरुषोत्तम व्हीला सोसायटीतील रहिवाशी एक तास स्वच्छतेसाठी व स्वतःसाठी हा उपक्रम राबवित आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही त्याचबरोबर परिसरातील स्वच्छता ही कोणीतरी दुसऱ्यांनी करावी ही अपेक्षा असते. मात्र येथील नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत परिसरातील स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्यासाठी रोज व्यायाम करत आहेत. रोज सकाळच्या गुलाबी थंडीत व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.येथील जेष्ठ नागरिक
अनिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुनिल शिंदे,राकेश कनकट्टी,सुधाकर महिंद्रकर,संतोष पवार, मेघराज हुणचे, दिनकर नारायणकर,कल्याणी कलमणी, मल्लिनाथ आचरेकर, राजीव सुलगडले,अमोल रंगदळ, ईश्वर लोकरे,लखन पौळ, व्यंकटेश बोगा , नितीन आगरखेड , साईनाथ रसोलगीकर,भारत साळुंखे , रेवप्पा काळे,नागराज वामने,शरणप्पा लोणी, राजशेखर हारके,माणिक ढेंबरे यांच्यासह रोहीत शिंदे, आदित्य नारायणकर, गौरीशंकर हुणचे,प्रणव बोल्ली यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
चौकट १:
हिवाळ्याच्या अल्हाददायक वातावरणात दररोज योगाभ्यास व परिसर स्वच्छता केल्याने स्वतःचे आरोग्य तर चांगले राहते त्याच बरोबर इतरांचेही आरोग्य सुधारण्यास मदत होईल सर्वांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा .
मेघराज हुणचे,योग प्रशिक्षक, विवेकानंद केंद्र सोलापूर तथा रहिवाशी पुरुषोत्तम व्हीला सोसायटी सोलापूर
चौकट २
सोलापुरातील पुरुषोत्तम व्हीला सोसायटी आम्हाला फाईव्ह स्टार सोसायटी बनवायची आहे.
सोलार एनर्जी चा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन या सर्वच विषयात आमच्या सोसायटीतील रहीवाशी काम करीत आहेत. त्यामुळे ही सोसायटी सोलापुरातील पर्यावरण पूरक सोसायटी बनणार आहे.
दिनकर नारायणकर, प्रवीण प्रशिक्षक, यशदा, पुणे तथा रहिवाशी पुरुषोत्तम व्हीला सोसायटी सोलापूर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!