अक्कलकोट : महाराष्ट्र सेट परीक्षेत डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली २६ विद्यार्थी उत्तीर्ण!
महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (एमएच-SET) २०२५ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत १५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अक्कलकोट येथील प्रगतशील शिक्षक डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची गौरवशाली नोंद झाली आहे.
डॉ. कौटगीमठ सरांनी देशातील विविध राज्यांतील ७९ वेळा सेट, नेट, टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून जागतिक विक्रम केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि प्रगल्भ ज्ञानाचा लाभ समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मिळावा, या हेतूने ते यूट्यूबच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन मार्गदर्शन देत आहेत. सध्या ५२,४०० विद्यार्थी त्यांच्या डिजिटल मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.
पेपर १ आणि पेपर २ साठी मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये १४०० उच्च-गुणवत्तेचे व्याख्यान व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेले विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतमजूर, मोटार मेकॅनिक अशा समाजाच्या विविध घटकांतील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
—
कोट १
सांगली जिल्ह्यातील आठपाडी येथील मुस्लिम समाजातील गरीब मोटार मेकॅनिक इलाही इनामदार यांनी इंग्रजी विषयात महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
“मी नेहमी डॉ. धानय्या सरांची व्हिडिओ पाहत असे. त्यांच्याकडून प्रचंड प्रेरणा मिळाली आणि त्याच जोरावर हे यश संपादन केले,” असे इनामदार यांनी आनंद व्यक्त केला.
—
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशयादी :
१. प्रा. शशिकांत कट्याप्पा कोळी – हिंदी (हंजगी, अक्कलकोट)
२. प्रा. विनायक कलशेट्टी – केमिकल सायन्स (अक्कलकोट)
३. प्रा. प्रीती केशेट्टी – गणित (सोलापूर)
४. प्रा. सीमा बिलुरे – केमिस्ट्री (सोलापूर)
५. प्रा. महेशकुमार बदने – एज्युकेशन (वय ५५, सातारा)
६. प्रा. इलाही इनामदार – इंग्रजी (मोटार मेकॅनिक, आठपाडी)
७. प्रा. रणजित जगदीश भालेराव – इंग्रजी (बार्शी)
८. प्रा. सूर्यकांत वसंत क्षीरसागर – एज्युकेशन (विटा)
९. प्रा. सूरज एम – इंग्रजी (बार्शी)
१०. प्रा. सुनीता विश्वनाथ फुले – मराठी (पुणे)
११. प्रा. अनुराधा सेलेनोफीले – इंग्रजी (पुणे)
१२. प्रा. ज्योती शिवाजी ठाकरे – एज्युकेशन (सांगली)
१३. प्रा. सोनाली भगत – इंग्रजी (मुंबई)
१४. प्रा. हर्षल सदाशिव चिंचगारे – वाणिज्य (नागपूर)
१५. प्रा. मेघा गावडे – (संगमनेर)
१६. प्रा. शुभम भालेराव – राज्यशास्त्र (संगमनेर)
१७. प्रा. महेश विठ्ठल जाधव – इंग्रजी (नांदेड)
१८. प्रा. पल्लवी वसंत बनसोडे – इंग्रजी (छत्रपती संभाजीनगर)
१९. प्रा. गणेश सुनील उफादे – समाजशास्त्र (लातूर)
२०. प्रा. सुनील एच – इंग्रजी (धुळे)
२२. प्रा. वैशाली ईश्वर दवणे – इंग्रजी (पुणे)
२२. प्रा. सुषमा कुलकर्णी – इंग्रजी (धुळे)
२३. प्रा. रंजना राहुल बागल – वाणिज्य (विटा)
२४. प्रा. रविकांत सोपान थोरवे – केमिस्ट्री (इंदापूर)
२५. प्रा. कृष्णा रामचंद्र भोसले – एज्युकेशन (कोल्हापूर)
२६. प्रा. गोविंद शिवदास बोंबीलवाड – वाणिज्य (लातूर)
—
डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी मिळविलेली ही यशस्वी घोडदौड अक्कलकोट तालुक्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
इतर विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. नुकतेच कर्नाटक सेट परीक्षेत ३०९ विद्यार्थी पास झाले होते आता पर्यंत १३५८ विद्यार्थी सेट नेट टी इ टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!