गावगाथा

सोमनाथ सुतार यांची समाजसेवा मोलाची – महेश इंगळे

डॉ.बी.आर.आंबेडकर सामाजिक पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल सुतार यांचा महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सन्मान केल्यानंतर व्यक्त केले मनोगत.

सोमनाथ सुतार यांची समाजसेवा मोलाची – महेश इंगळे
डॉ.बी.आर.आंबेडकर सामाजिक पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल सुतार यांचा महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सन्मान केल्यानंतर व्यक्त केले मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.११/१२/२५)
आमच्या स्विमिंग ग्रुपचे सदस्य तथा पत्रकार सोमनाथ सुतार यांची समाजसेवा मोलाची असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतेच समाजसेवक व पत्रकार सोमनाथ सुतार यांना डॉ.बी.आर. आंबेडकर या प्रतिष्ठित सामाजिक पुरस्काराने सन्मानाने गौरविण्यात आले. या निमीत्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पत्रकार सोमनाथ सुतार यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी हा पुरस्कार फेमस पिपल इंडिया वर्ल्ड तर्फे सामाजिक कार्य, समानता, शिक्षण आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान केला जातो. सोमनाथ सुतार हे आय.एस.ओ. प्रमाणित तसेच भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस या राष्ट्रीय स्तरावरील माध्यम संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समस्यांवर प्रकाश टाकणे, वंचित घटकांपर्यंत न्याय पोहोचविणे, आणि सामाजिक जाणिवा निर्माण करणे या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत डॉ.बी.आर.आंबेडकर या प्रतिष्ठित सामाजिक पुरस्कार समितीच्या वतीने समितीच्या मूल्यांवर आधारित समानता, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी सोमनाथ सुतार यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून, प्रगतशील आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यास सुतार यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याने आम्हाला सुतार यांच्या कार्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी स्वामींचे आशीर्वाद देऊन आज येथे सोमनाथ सुतार यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे मनोगतही महेश इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी हा सन्मान मिळाल्याबद्दल व श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद तसेच महेश मालक इंगळे यांची साथ व शुभेच्छा पाठीशी घेऊन सुतार यांनी आयोजकांचे आभार मानत समाजासाठी निष्ठेने सेवा करत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, उद्योगपती अंकुश केत, प्रा.शिवशरण अचलेर, चंद्रकांत गवंडी, विपुल जाधव, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, काशिनाथ इंडे, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार आदींसह स्विमिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळ – सोमनाथ सुतार यांचा सत्कार करताना महेश इंगळे, अंकुश केत, प्रा.शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button