श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू :श्री स्वामी समर्थाच्या दर्शनानंतर मोहोळ नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष
सिद्धी वस्त्रे यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, दि.२६/१२/२५.अ.कोट) श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन जनतेची प्रामाणिकपणे सेवा करू असे मनोगत मोहोळ नगरपालिका निवडणुकीत सर्वात कमी वयाचे (वय – २२) नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले मोहोळ नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष सिद्धी राजू वस्त्रे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच नगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे बोलत होत्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांनीही नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, श्रीकांत मलवे,
प्रसाद सोनार, समर्थ स्वामी, तुषार मोरे, धनराज स्वामी आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!