स्वामींचे आशिर्वाद व महेश मालकांची साथ मोलाची – शेखर आडवितोटे
वाढदिवसानिमीत्त शेखर आडवितोटे यांचा व
गोवा गोमंतक पुरस्कार लाभल्यानिमीत्त श्रीकांत झिपरे यांचा स्विमींग ग्रुपच्या वतीने महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(दि.२२/०९/२५, अ.कोट) –
श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद व येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांची साथ माझ्या जीवनासाठी खुप मोलाची असल्याचे मनोगत येथील प्रतिष्ठीत व्यापारी व स्वामी भक्त तथा स्विमींग ग्रुपचे सदस्य शेखर आडवितोटे यांनी व्यक्त केले. आज शेखर आडवितोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यानंतर वाढदिवस अभिष्टचिंतनानिमीत्त स्विमींग ग्रुपला उपस्थिती दर्शविली. यावेळी स्विमींग ग्रुपचे संस्थापक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी शेखर आडवितोटे यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ शेखर आडवितोटे यांचा
तर स्विमींग ग्रुपचे सदस्य श्रीकांत झिपरे यांना गोवा गोमंतक गुणवंत पुरस्कार लाभल्याप्रित्यर्थ श्रीकांत झिपरे यांचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री.स्वामी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित आशिर्वाद पुरक सन्मान करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शेखर आडवितोटे बोलत होते. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे, प्रा. शिवशरण अचलेर, संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, अरविंद पाटील, बाबा सुरवसे, सुनिल पवार, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, अमर पाटील, राजू एकबोटे, सचिन किरनळ्ळी, रमेश शिंदे, काका सुतार, राजू एकबोटे, प्रसन्न हत्ते, कुमार हत्तुरे, अशोक कलशेट्टी, विद्याधर गुरव, श्रीपाद पुजारी, ओंकार उटगे, राजू एकबोटे, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, महांतेश स्वामी, मल्लिनाथ माळी, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ गवळी इत्यादीनी उपस्थित राहून शेखर आडवितोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ – शेखर आडवितोटे व श्रीकांत झिपरे यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!