जेऊर जि.प. गटातून जनतेची मागणी : मुकेश (भुताळी) कांबळे यांच्या रूपाने भाजपला उमेदवार मिळावा
जेऊर — जेऊर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मुकेश (भुताळी) कांबळे यांचे नाव जनतेतून जोरकसपणे पुढे येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून मुकेश कांबळे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी खुलेपणाने बोलली जात आहे.
मुकेश कांबळे हे २०१२ पासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान सदस्य असून, गेली १२ वर्षे जेऊर शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले आहे. पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ पातळीवर कार्यकर्ते घडवणे, तसेच प्रत्येक निवडणुकीत पक्षासाठी झोकून देऊन काम करणे, यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण जेऊर परिसराची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्या निवडणुकीत मुकेश कांबळे यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या संघटनामुळे जेऊर परिसरातून ७४० मतांची आघाडी मिळाली होती. तत्कालीन उमेदवार सचिन दादा निवडून यावेत यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिवसरात्र मेहनत केली होती. अनेक ठिकाणी त्यांनी देवदेवतांना साकडे घालून, भावनिक आणि संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र बांधले होते.
पक्षवाढीसाठी सातत्याने काम करणारा, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारा आणि सर्व समाजघटकांना सोबत घेणारा नेता म्हणून मुकेश कांबळे यांची ओळख आहे. मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ता म्हणून त्यांनी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठीही कायम प्रयत्न केले आहेत. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मुकेश कांबळे यांच्या नावाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
जेऊर गटातील जनतेचा विश्वास, संघटनात्मक अनुभव आणि पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेता, भाजपने मुकेश (भुताळी) कांबळे यांना उमेदवारी दिल्यास जेऊर जि.प. गटात पक्षाला निश्चितच बळकटी मिळेल, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!