पत्रकार अमोल राजपूत यांच्या वडिलांचा वाढदिवस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भक्तिमय वातावरणात साजरा

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार अमोल राजपूत यांचे वडील देशमुख बोरगांव येथील छन्नसिंग राजपूत यांचा वाढदिवस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी छन्नसिंग राजपूत यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी वाढदिवसानिमित्त छन्नसिंग राजपूत यांना शुभेच्छा दिल्या. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते स्वामींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन छन्नसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, प्रशांत साठे, प्रवीण घाडगे, गोटू माने, एस. के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, दत्ता माने, राजू पवार, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत सेवा, भक्ती व अन्नदानाच्या कार्यात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व सेवाभावाच्या वातावरणात पार पडला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!