स्वयंसेवकांनी समाज परिवर्तनाची चळवळ गतिमान करावी
मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या वागदरी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रतिपादन
अक्कलकोट :
सामाजिक विचार झपाट्याने बदलत आहेत, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संघटनेवर टीका करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे, अशा स्थितीत राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी समाजाचे विचार प्रगल्भ करण्यासाठी चळवळ उभी केली पाहिजे, श्रमदानाच्या माध्यमातून चळवळ गतिमान करावी असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वागदरी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकज सुतार होते. व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन मसुती, प.पू. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, किरनळ्ळीचे सरपंच संगीता भंडारे, धोंडप्पा यमाजी, प्रदीप जगताप, कमलाकर सोनकांबळे, हनीफ मुल्ला, शिवराज पोमाजी, बापूराव चव्हाण, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण, पडीक जमीन लागवड, श्रमदान, उत्पन्नाचे स्त्रोत आदीबाबत स्वयंसेवकांनी प्रबोधन केले पाहिजे, यामुळेच समाजपरिवर्तन जलद गतीने होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन बापूजी चव्हाण व समर्थ पवार यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा राजेश पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा शितल झिंगाडे भस्मे, प्रा मधुबाला लोणारी यांनी प्रयत्न केले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!