*रामलिंगेश्वर शिक्षण संकुलनात रायझिंग डे सप्ताह संपन्न*
श्रीक्षेत्र तीर्थ ता.द.सोलापूर दि.६
रामलिंगेश्वर शिक्षण संकुलनात वळसंग पोलीस स्टेशनच्या वतीने १ ते ७ जानेवारी दरम्यान राबवण्यात येणारे रायझिंग डे सप्ताह निमित्त वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
यावेळी राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना कायदे संरक्षण,वाईट प्रवृत्ती पासून दूर , विद्यार्थी समस्या , पोलीस जनतेशी संपर्क आधी विषयावर सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी व तसेच चांगला माणूस बनण्याचे आव्हान केले.
तसेच निर्भया पथक बिराजदार व मनीषा चिंचोळकर यांनी विद्यार्थिनींना टोल फ्री नंबर 112,108, व शालेय जीवनात येणारे समस्या अडचणी व उपाययोजना, तक्रार, चांगले स्पर्श, वाईट स्पर्श यावर स्पेशली विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.श्री हलगणे यांनी पोलीस दलातील शस्त्र व त्यांचे वापर प्रत्यक्ष दर्शनी माहिती दिली.व तसेच वाहने व वाहतूक नियम विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य सुधीर सोनकवडे सर्व शिक्षकवृद शिक्षकेत्तर कर्मचारी वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री मल्लिनाथ बंदीछोडे , श्री चव्हाण , श्री सय्यद , श्री काळोखे, श्री मुलाणी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!