दिल्लीत रंगणार अस्सल सोलापुरी ‘हुरडा पार्टी’ आणि मराठमोळी संक्रांत महोत्सव
हुरडा किंग काशीनाथ भतगुणकी यांच्या ड्रीम फाउंडेशन बसव संगम शेतकरी गट यांना हुरडा पार्टीसाठी महाराष्ट्रातून विशेष निमंत्रण
महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार
नवी दिल्ली,1 : राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असून धुक्याची चादर पसरली आहे. अशा वातावरणात दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ऊब देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात अस्सल सोलापुरी ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे 09 ते 11 जानेवारी या कालावधीत दु. 12 ते 9.30 या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी दिली.या हुरडा पार्टी साठी ड्रीम फाउंडेशनच्या बसव संगम शेतकरी गटाला निमंत्रण आले असून सोलापुरातून 5 शेतकरी व 7 महिला बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सर्व हुरडा साहित्य घेऊन रेल्वेने व विमानाने जाणार असल्याचे हुरडा पार्टी समन्वयक बसव संगम शेतकरी गटाचे कार्याध्यक्ष काशीनाथ भतगुणकी व जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिले,
महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता विशेषतः हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.
संक्रांतीचा गोडवा आणि अस्सल सोलापुरी हुरड्याचा खमंग स्वाद
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात ‘तिळगूळ’ आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. यामध्ये अस्सल सोलापूरी हुरडा ,शेंगा चटणी,गावरान बोर,ऊस,डहाळे,सेंद्रिय गुळ,सोलापुरी मका चिवडा,स्पेशल फरसाण ,शेव,मसाला शेंगा,डाळिंब,गावरान पेरू,कच्चे शेंगा,आणि जेवण बनविण्यासाठी जिजाऊ महिलामहिला बचत गटातील महिला टीम विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी जाणार आहेत दिल्लीत सोलापुरी ठेचा,शेंगा पोळी,धपाटे, चुलीवरचे भाकरी,बाजरी भाकरी, मिलेट रोटी,मसाला रोटी,बाजार आमटी,बेसन पिटला,पेंडपाला,रान भाजी,संक्रांत स्पेशल तिळ गुळ,ज्वारी बाजरी उंडे,पालक कढधान्य भाज्या,बाजार आमटी,मेजवानी देणार असल्याचे अस्सल सोलापुरी पाहुणचार संचालिका सौ संगीता भतगुणकी यांनी सांगितले,
शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, स्वीटकॉर्न,शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरी, बटाटेवडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरबराअशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे.थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. 9 ते 11 जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.
अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी साठी सोलापूर हून हुरडा उत्पादक शेतकरी परमेश्वर भतगुणकी,सतीश पाटील ,विजयकुमार कांबळे आणि राजमाता जिजाऊ बचत गटाचे सौ कस्तुरी पाटील, राजश्री बगले,सौ भारती बिराजदार,सौ शान्नमा हिरापूरे आदी महिला जाणारा आहे,
एकूण 5000 लोकांना पुरेल इतके साहित्य व 300 किलो हुरडा सलग तीन दिवस मेजवानी असणार आहे,
विमानाने हुरडा घेऊन 3 शेतकरी जाणार दिल्लीतील हुरडा पार्टीला 91 वर्षीय श्री गुरुशांत भतगुणकी आपल्या बसव संगम शेतकरी गटातील हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना व हुरडा चोलणारे 50 वर्ष अनुभवी शेतकरी सोबत जाणार आहेत,
दिल्लीतील हुरडा पार्टीत लोकांना पार्सल सुविधा उपलब्ध असून ऑर्डर साठी संपर्क काशीनाथ भतगुणकी मो 9890948388
नवी दिल्ली येथील हुरडा पार्टी साठी सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन व बसव संगम शेतकरी गट व जिजाऊ महिला बचत गट टीमला जिल्हा कृषी विभाग,जिल्हा प्रशासन,डीआरएम सोलापूर रेल्वे विभाग,हुरडा उत्पादक शेतकरी, यशस्विनी ऍग्रो प्रो कंपनी,अस्सल ड्रीम सोलापुरी पाहुणचार टीम यांचे सहकार्य मिळाले आहे
Back to top button
×
No WhatsApp Number Found!