गावगाथा

१४८ व्या स्वामी पुण्यतिथी निमीत्त श्री वटवृक्ष मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ.

पारंपारीक भजन व नामस्मरणाने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणा सप्ताहाचे शुभारंभ.

१४८ व्या स्वामी पुण्यतिथी निमीत्त
श्री वटवृक्ष मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ.
  • पारंपारीक भजन व नामस्मरणाने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणा सप्ताहाचे शुभारंभ.
प्रथमेश इंगळे यांच्या माध्यमातून वीणा सप्ताहाची सुरुवात ही इंगळे कुटूंबातील चौथ्या पिढीची सेवा.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.०८/०४/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवातील अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात आज बुधवार दिनांक ०८/०४/२०२६ रोजी पहाटे ६ वाजता झाली. देवस्थानच्या गाभारा मंडपात मोठया भक्ती भावाने व अपार श्रध्देने तथा सत्संग महिला भजनी मंडळ यांचे
पारंपारीक भजन व नामस्मरणाने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणा सप्ताहाचे शुभारंभ करण्यात आले. अखंड नामवीणा सप्ताहाचा समाप्ती सोहळा
श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजी बुधवार दिनांक १५/०४/२६ रोजी सकाळी ७ वाजता देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न होईल.
प्रारंभी या वीणा सप्ताह महोत्सवाच्या सुरुवातीस मंदार पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मुख्य गाभाऱ्यात वीणापूजन होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर यांचे पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आले. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व आहे. सतत ७ दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही चौथी पिढी आहे. याप्रसंगी इरपा हिंडोळे, कौशल्या जाजू, प्रदीप हिंडोळे, अक्षय सरदेशमुख, बाबर, निर्मलाताई हिंडोळे, सुरेखा तेली, स्वाती गंभीरे, भंडारे, प्रसाद सोनार, बाळासाहेब घाटगे, प्रसन्न हत्ते, ज्ञानेश्वर भोसले, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, नागनाथ गुंजले, गिरीश पवार, संजय पवार, संतोष पराणे, देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.
फोटो ओळ — नामवीणा सप्ताह शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button