गावगाथा

वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले यांचा स्वामींचे कृपावस्त्र पांघरुन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सत्कार.

वाढदिवस विशेष

वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले यांचा स्वामींचे कृपावस्त्र पांघरुन महेश इंगळे यांच्या हस्ते झाला सत्कार.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२८/०४/२६)

        येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या वाढदिवस श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानच्या अतिथी कक्षात मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी अमोलराजे भोसले यांचा वाढदिवसानिमीत्त श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र पांघरून व स्वामींचे प्रसाद मिठाई भरवून यथोचित सन्मान करून अमोलराजे भोसले यांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अमोल राजे भोसले यांनी महेश मालक इंगळे व माझे पितामह तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय (महाराज) भोसले व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिवार हे सर्व आपण स्वामी सेवेत आहोत हे आपणासर्वांसाठी खुप अभिमानाची बाब आहे. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे स्वामी सेवेचे हे कार्य व सेवा करण्यास या पुढेही श्री स्वामी समर्थाचे आशिर्वाद नेहमीच आपणा सर्वांच्या पाठीशी असतील असे मनोगत व्यक्त करुन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व महेश मालक इंगळे यांचे स्नेह पुर्वक ऋणानुबंध व आशिर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला व आज येथे झालेल्या सन्माना प्रित्यर्थ सर्वांचे मन पुर्वक आभार मानले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव यांनी ही अमोलराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ – वाढदिवसानिमित्त अमोलराजे भोसले यांचा स्वामींचे कृपावस्त्र पांघरुन सत्कार करताना मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button