धनेश आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणीत ६५ जणांचे रक्तदान
बोरामणी : बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख धनेश आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ६५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

धनेश आचलारे मित्र परिवार सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असून दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीही वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मल्लिकार्जुन ब्लड सेंटरचे प्रमुख अमजद पठाण, सत्यम गायकवाड, जनसंपर्क अधिकारी नंदिनी मस्के, विशाल कोलूर, टेक्निशियन मिसबा कोटी, लता श्रीमल, अभिषेक राऊत तसेच ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सत्कारमूर्ती धनेश आचलारे म्हणाले की, वाढते अपघात, विविध आजार तसेच रखरखत्या उन्हाळ्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वत्र रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. प्रत्येक युवकाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!