मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर सोलापूरच्या ‘गावगाथा’ अंकाने द्वितीय क्रमांक पटकावला…
मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230117_114039_167-540x470.jpg)
मराठाबोली दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर सोलापूरच्या ‘गावगाथा’ अंकाने द्वितीय क्रमांक पटकावला….
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
पुणे — मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.एकूण ३६० दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत मिरजच्या ‘सारांश’ व पुण्याच्या ‘क्रिकथा’,’तेजोमय आणि ‘अनुरव”या दिवाळी अंकांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक ठाण्याच्या ‘सृजन संवाद ‘,सोलापूरच्या ‘गावगाथा’आणि पुण्याच्या ‘समतोल’या अंकांना मिळाला .तर नागपूरच्या ‘पत्रभेट’,पुण्याच्या ‘आनंदतरंग’ आणि उदगीरच्या ‘जनस्तंभ’या अंकांनी तृतीय क्रमांक पटकावला.परिक्षक म्हणून रजनी धोंगडे,शरद अत्रे,शिवाजी उराडे,जयंत कोपडेकर,श्रीपाद टेंबे आणि हेंमत परब यांनी काम पाहिले.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील पहिल्यांदाच ओढ गावाकडंच्या मातीशी हि संकल्पना घेऊन ग्रामीण संस्कृती,रुढी परंपरा व ग्रामीण साहित्यावर आधारित ‘गावगाथा’ पहिलाच अंक वाचकांच्या पसंतीला उतरला असून मराठबोली दिवाळी अंक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटाकावले आहे. याबद्दल गावगाथा चे संपादक धोंडपा नंदे यानी आंनद व्यक्त करत कधी वाटले नव्हते मान्य परिक्षक कडून दखल घेऊन उत्कृष्ट दिवाळी गावगाथा ला पुरस्कार मिळेल.मराठबोली ठिमचे मनापासून धन्यवाद.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)