स्वामी भक्तांकरिता महाप्रसाद सेवेबरोबरच स्वच्छता, प्रसन्नता हे या न्यासाच्या परिसराचे वैशिष्टेसहाय्यक आयुक्त पै.विजय चौधरी (वाहतूक)
श्री स्वामी समर्थ अन्नक्षेञ मंडळ अक्कलकोट

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वचस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने स्वामी भक्तांकरिता महाप्रसाद सेवेबरोबरच स्वच्छता, प्रसन्नता हे या न्यासाच्या परिसराचे वैशिष्टे असल्याचे मनोगत महाराष्ट्र केसरी तिहेरी विजयते पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त पै.विजय चौधरी (वाहतूक) यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, धानप्पा उमदी, अभियंता अमित थोरात, दत्ता माने, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, प्रवीण घाडगे, राजू पवार, प्रसाद हुल्ले, निखील पाटील, गोविंदराव शिंदे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
