महेश इंगळे यांच्या हस्ते समर्थ अण्णा कलशेट्टी यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार
समर्थ अण्णा कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमीत्त सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, दर्शन घाटगे व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळे यांच्या हस्ते समर्थ अण्णा कलशेट्टी यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.१६/०५/२५) –
येथील अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलीत सी.बी.खेडगी महाविद्यालयाचे प्राध्यापक गणपतराव कलशेट्टी यांचे चिरंजीव समर्थ अण्णा कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी समर्थ अण्णा कलशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. हा सत्कार समारंभ सोहळा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये संपन्न झाला. यावेळी बोलताना समर्थ अण्णा कलशेट्टी यांनी लाखो भाविकांसह आमच्या कलशेट्टी कुटूंबियांचे आराध्य दैवत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे मुळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात महेश मालक इंगळे व प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते माझ्या वाढदिवसानिमीत्त सत्कार झाल्याने श्री स्वामी समर्थांचे कृपाछ्त्र माझ्या पाठीशी असल्याची जाणीव झाली आहे. मंदीर समितीच्या वतीने अशा प्रकारच्या सत्कार सोहळयांचे उपक्रम महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी हाती घेतल्या पासून भाविकांना श्री स्वामी कृपेची उब व वरदहस्त पाठीशी असल्याचे समाधान भाविकांना लाभत आहे. या पार्श्वभुमीवर आज येथे माझा वाढदिवस साजरा होवून माझा सन्मान होणे माझ्या व्यक्तीगत आयुष्याकरीता अभिमानास्पद बाब आहे. माझ्या वाढदिवसानिमीत्त महेश मालक इंगळे व प्रथमेश मालक इंगळे व मित्र परिवाराने व्यक्त केलेल्या प्रेमपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून सर्वांचे आपल्यावरील प्रेम असेच कायम राहावे अशी सदिच्छा व्यक्त करतो व या सन्मानाप्रित्यर्थ आभार व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीशैल गवंडी, प्रा. गणपतराव कलशेट्टी, विश्वस्त महेश गोगी, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, दर्शन घाटगे, तुषार मोरे, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – समर्थ अण्णा कलशेट्टी यांच्या वाढदिवसानिमीत्त सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, दर्शन घाटगे व अन्य दिसत आहेत.
