यंदा मुबलक पाऊस मात्र नैसर्गिक आपत्तीचे संकेत सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक
सोलापूर सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/1673844186-245b7195-ddee-42bf-9490-2033a1fbd17d.jpg)
यंदा मुबलक पाऊस मात्र नैसर्गिक आपत्तीचे संकेत सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सोलापूर यंदा राज्यात मुबलक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज सोलापुरात येथील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीतून व्यक्त करण्यात आला आहे. नैसर्गिग आपत्तीचे संकेत आहेत. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील होम विधीचा सोहळा पार पडल्यानंतर होमविधीचा सोहळा झाला. त्यानंतर भाकणूकीचा कार्यक्रम झाला. परंपरे प्रमाणे देशमुखांच्या वासराला शेतात उपाशी ठेवून भाकणूकस्थळी आणले. राजशेखर देशमुख यांनी वासराची पूजा केली. सुरूवातीलाच वासराने मूत्र आणि मल विसर्जन केले. यावरून यावर्षी भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हिरेहब्बू यांनी केला. वासरू काही काळ बिथरले असल्याने यंदा नैसर्गिक आपत्तीचे संकेत देण्यात आले. या सोबतच दिवसभर उपाशी असलेल्या वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले. मात्र, वासराने कशालाच स्पर्श न केल्याने यंदा सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील, असे हिरेहब्बू म्हणाले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)