राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कुरनूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब अक्कलकोट यांच्या हस्ते करण्यात आले .
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान,कुरनूर यांच्या वतीने सामाजिक उपक्रम घेऊन उत्साहात साजरी करण्यात आली.
दि.१२/१/२०२३ रोजी ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. स्वस्तिक विक्रम बावडे व साक्षी लक्ष्मण कोळी या दोन विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानकडुन दत्तक घेण्यात आले.आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने मनोज तानाजी सुरवसे यांना सन्मानित करण्यात आले.जिजाऊ वेषभूषा याही स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये ७० जणांनी सहभाग घेतला.या सर्व पुरस्कारचे वितरण अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (राजासाहेब ऑफ अक्कलकोट), औदूंबरजी पाटील (पोलीस निरीक्षक,कोल्हापूर), बाळासाहेब मोरे(माजी पं.स.विरोधी पक्षनेते), अमर पाटील(माजी सरपंच,कुरनूर)यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमंत राजेसाहेब यांनी प्रतिष्ठान च्या विविध कार्यांविषयी माहिती घेतली व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
तसेच कुरनूर येथील ज्ञानसागर कृषी भांडार येथे श्रीमंत राजेसाहेब यांचा सत्कार औदुंबर पाटील , अमर पाटील , राजाभाऊ बिराजदार यांचा हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठान चे अध्यक्ष विश्वजीत बिराजदार यांनी केले,तर आभार प्रदर्शन उत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी केले.हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी,केदार मोरे,मनोज सुरवसे,सुनिल इंडे,आनंद बिराजदार,श्रीकांत चेंडके,गोपाळ बिराजदार,अमर दगडे,नारायण निंबाळकर,ऋषी मोरे,मारूती मोरे,ज्ञानेश्वर बिराजदार,शशिकांत चेंडके,आकाश सुरवसे,किरण येवते,अभिषेक काळे,रोहिदास डिग्गे,अमर कांबळे,दत्ता बिराजदार आदी सदस्यांनी व पदाधिका-यांनी परीश्रम घेतले…
More Stories
एसबीआय वागदरी शाखेकडून मृतांच्या वारसांना २० लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द
Akkalkot station ; वृक्षारोपण करून साजरा केला वाढदिवस ; दरवर्षी वृक्षारोपणानेच वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प या ग्रामपंचायत सदस्यांनी केला
Akkalkot Rural : गावगाथा impact..! गावगाथा ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची प्रशासनाकडून दखल ; श्वास गुदमरत असलेल्या वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तात्काळ साफसफाई