गावगाथा

प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला, 18 जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा; जन्मजेयराजे भोसले यांची प्रतिक्रिया

मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने अक्कलकोट बंदचा निर्णय

प्रवीण दादांवरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला, 18 जुलैच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा; जन्मजेयराजे भोसले यांची प्रतिक्रिया

येत्या 18 तारखेच्या अक्कलकोट बंदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रवीण दादावरचा (Praveen Gaikwad) हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक निषेधार्थ 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. काल (15 जुलै) यासंदर्भात सोलापुरात बैठक सुरू असताना मोठा गोंधळ झाल्याने जन्मजेयराजे भोसले हे  बैठकीतून निघाले होते. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख एका तरुणाने केल्याने मोठा वाद झाला होता. या वादानंतर अक्कलकोट बंद संदर्भात जन्मजेयराजे भोसले काय भूमिका घेतात हा प्रश्न चर्चेत होता, यावर आता त्यांनी स्वत: स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे.  सोबतच अक्कलकोट बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने अक्कलकोट बंदचा निर्णय

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही फेक विरोधात 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचा एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करा, सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी सोलापुरातील विश्रामगृह येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतनंतर करण्यात आली आहे. अमोल राजे भोसले यांच्या संदर्भात एका कार्यकर्त्याला गैरसमज झाला होता. या गैरसमजुतीतून हा गोंधळ उडाला. मात्र त्यानंतर बैठक सुरळीत पार पडली. यावेळी समाजाच्या बैठकीत झालेल्या गोंधळानंतर मराठा समाज समन्वयकांनी माहिती देत  18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची माहिती दिली. अक्कलकोट बंदच्या संदर्भाने नियोजन करण्यासाठी आज अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीत जन्मजेयराजे भोसले हे देखील सहभागी होतील. अशी माहिती मराठा समाज समन्वयकांची बैठकीनंतर दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button