गावगाथा

PCMC murder case : बहिणीची छेडछाड केल्याच्या रागातून वाकडमध्ये तरुणाचा खून; तीन जण ताब्यात

HTML img Tag Simply Easy Learning    

वाकड, दि.२१ सप्टेंबर २६: वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून आरोपींनी तरुणाला मारहाण केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्यापूर्वी कावेरीनगर भाजी मंडईसमोरील कचरा टाकण्याच्या ठिकाणी घडली. मारोती बाळासाहेब बनसोडे (वय ३५, रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) याला आरोपींनी तोंड, गळा, हनुवटी तसेच शरीराच्या इतर भागांवर मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रकरणी सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमित दशरथ साळुंखे (वय २६), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९) आणि भारत संजय पवार (वय २३) या तिघांना अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९५/२०२६ दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) तसेच भादंवि कलम ३०२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटनेमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि खुनाचा घटनाक्रम याबाबत वाकड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button