गावगाथा

तांत्रिक निकष न पाहता अक्कलकोट, दक्षिण सोलापूरला दुष्काळ जाहीर करा! आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

दुष्काळाचा झळा

तांत्रिक निकष न पाहता अक्कलकोट, दक्षिण सोलापूरला दुष्काळ जाहीर करा!

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

सोलापूर : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेतील तांत्रिक निकषांमुळे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुके दुष्काळाच्या यादीतून वंचित राहू नयेत. दोन्ही तालुक्यांतील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून विशेष बाब म्हणून दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेनुसार पावसातील खंडाचा ठराविक निकष निश्चित करण्यात आला आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत सलग २० दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर केवळ २.५ मिलिमीटर पाऊस झाला आणि पुन्हा सुमारे २० दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे तांत्रिक निकषांमध्ये अडचण निर्माण होत असली, तरी केवळ कागदावरील निकष न पाहता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

अल्प पर्जन्यमान, दीर्घकाळचा पावसाचा खंड, खालावलेली भूजल पातळी तसेच कोरडे पडलेले तलाव व जलसाठे यामुळे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

HTML img Tag Simply Easy Learning    

याच पार्श्वभूमीवर आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तांत्रिक निकषांचा अडसर न ठेवता दोन्ही तालुक्यांना विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील सद्यस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button