गावगाथा

Akkalkot : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत खेडगी कॉलेजचे घवघवीत यश ; तीन मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि. २६ – तालुका क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत अक्कलकोट येथील अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी कॉलेजच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले असून, त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

स्पर्धेत विविध वयोगट व वजनगटांमध्ये मल्लांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. खेडगी कॉलेजच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. यामध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको-रोमन ४५ किलो वजनगटात जमीर शेख, १९ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको-रोमन ५५ किलो वजनगटात किरण भिमाशंकर राऊत आणि १९ वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाईल ९२ किलो वजनगटात खादीर राजेभाई शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

HTML img Tag Simply Easy Learning    

या तिन्ही मल्लांची आता जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या यशामुळे खेडगी कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. सोहेल शेख, जिमखाना विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार तसेच सुधीर राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, सचिव सुभाष धरणे, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक नीलप्पा भरमशेट्टी, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button