अध्यात्म आणि जीवनाची सांगड स्वामी भक्तीतून घालावी – डॉ.देवळणकर
वटवृक्ष मंदिरातील सन्मानाअंती डॉ. देवळणकरांचे मनोगत

अध्यात्म आणि जीवनाची सांगड स्वामी भक्तीतून घालावी – डॉ.देवळणकर

वटवृक्ष मंदिरातील सन्मानाअंती डॉ. देवळणकरांचे मनोगत

आपल्या मानवी जीवनात अंतरिक सुख लाभाची व्यवस्था ज्या साधनेने होते ते साधन म्हणजे अध्यात्म. आत्म्याविषयी ज्याला आस्था आहे त्याच्याकडे आध्यात्माचा भांडार असतो. अध्यात्म आणि आत्मा हेच परमेश्वराचे अर्थात स्वामी समर्थांचे मूळ रूप आहे. देह, अंतकरण, प्राण, जीव, ईश्वर, ब्रम्ह या साऱ्यांनाच गौणत्वाने व प्राधान्याने आत्मा असे म्हणतात म्हणून त्यांच्या स्वरूपाविषयी विवेचन असणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र होय. या अध्यात्म शास्त्राची महती कलियुगातील दैवत ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याने अजूनही प्रचलित आहे,
त्यामुळे मनुष्याने आपल्या मनुष्य जन्माच्या माध्यमातून अध्यात्म आणि जीवनाची सांगड स्वामीभक्तीतून घालावी असे मनोगत जागतिक स्तरावरील विश्लेषक व उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी डॉ. देवळणकर बोलत होते. पुढे बोलताना डॉ. देवळणकर यांनी स्वामी समर्थांच्या भक्ती परंपरेचा वारसा अखंड तेवत ठेवण्यासाठी सर्व स्वामीभक्त नियमित प्रयत्नशील आहेतच, परंतु भाविकांनी अध्यात्माने जीवनाची सांगड स्वामी भक्तीतून घातल्यास जीवनाचे सार उलगडून जीवन सुख समृद्धीने व भरभराटीने उजळून निघेल असेही मनोगत डॉ.देवळणकर यांनी व्यक्त केले. तसेच वटवृक्ष मंदिरातील भक्तीमय वातावरण, प्रसन्न सुशोभीकरण पाहून या वातावरणात भाविकांना दृढ स्वामी भक्तीचा आनंद लुटता येत असल्याचे पाहून समाधान वाटल्याचेही स्पष्टीकरण केले. याप्रसंगी ऋतुराज बुवा, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, शिवकुमार स्वामी, सुनील प्रचंडे,
रुद्रय्या स्वामी, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, संजय पवार आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.शैलेंद्र देवळणकर व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
