प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदावर नोकरी करावी, कधी गावाच्या बाहेर न गेल्या आईचं स्वप्न जेव्हा मुलगा पूर्ण करतो… सोशल मीडियावर भावूक करणारी पोस्ट
आईला घडवली सिंगापूरची सफर, स्वत:चं ऑफिसही दाखवलं... मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू

आईला घडवली सिंगापूरची सफर, स्वत:चं ऑफिसही दाखवलं… मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू

प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदावर नोकरी करावी, कधी गावाच्या बाहेर न गेल्या आईचं स्वप्न जेव्हा मुलगा पूर्ण करतो… सोशल मीडियावर भावूक करणारी पोस्ट

प्रत्येक आई-बाबाचं स्वप्न असतं आपल्या मुलाने खूप शिकावं, मोठ्या पदावरची नोकरी करावी. यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही आई-बाबा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट करतात. आणि मुलगा जेव्हा आई-बाबांचं हे स्वप्न साकार करतो तेव्हा आई-बाबांच्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज होतं. सोशल मीडियावर सध्या अशीच एक भावूक करणारी कहाणी व्हायरल होत आहे. कधी गावाच्या बाहेर न पडलेल्या अशिक्षित आईला मुलाने चक्का सिंगापूरची सफर घडवली आणि सिंगापूरमधलं (Singapore) आपलं कार्यालयही दाखवलं. मुलाच्या या कृतीचं सर्वच जण कौतुक करत आहेत.

मुलाने आईला घडवली सिंगापूरची सफर
दत्तात्रय नावाच्या एका मराठी तरुणाने लिंक्डीइनवर (Linkedin) ही भावूक पोस्ट शेअर केली आहे. दत्तात्रय नोकरीनिमित्ताने सिंगापूरमध्ये असतो. इथं सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer म्हणून नोकरी करतो. गाव-खेड्यात लहानाचा मोठा झालेला दत्तात्रय चांगलं शिक्षण घेऊन सिंगापूरमध्ये मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतो. पण त्याची आई गावाच्या बाहेरही कधी पडली नव्हती. आपल्या शिक्षणासाठी अपार कष्ट करणाऱ्या आईने विमान प्रवास करावा, परदेश पाहावा यासाठी दत्तात्रयने मनाशी निर्धार केला.

आपण नोकरी करत असलेल्या सिंगापूरला आईला नेण्याचं त्याने ठरवल आणि ते अंमलातही आणलं. दत्तात्रयने आपल्या आईला पहिल्यांदाच विमान प्रवास घडवला. आईला सिंगापूरची सफर घडवत काम करत असलेल्या कार्यालयातही नेलं. मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईच्या भावना मुलाने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
दत्तात्रयची पोस्ट चर्चेत
दत्तात्रयने आपला आणि आईचा सिंगापूरमधला एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. त्यासोबत त्याने एक पोस्टही लिहिलीय. त्या त्याने म्हटलंय, परदेशात प्रवास करणारी तिच्या पिढीची ती पहिला महिला आहे. आईला परदेश आणि माझं कार्यालय दाखवण्यासाठी सिंगापूरला घेऊन आलोय, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आईने संपूर्ण जीवन गावात व्यतीत केलं. विमानात बसायचं दूरच तीने कधी विमान जवळूनही पाहिलं नाही. आज माझे वडिल जीवंत असते तर त्यांना देखील हा अनुभव घेतला असता. पुढे दत्तात्रयने म्हटलं, जे परेदशात प्रवास करतात त्यांना मी विनंती करतो आपल्या जन्मदात्यांनाही जगाता दूसरा सूंदर भाग दाखवण्याचा प्रयत्न करा. मला विश्वास आहे की त्यांना जो आनंद होईल त्याची तुलना कशाबरोबर करता येणार नाही’

दत्तात्रयच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव
दत्तात्रयने ही पोस्ट लिंक्डइन या सोशल पोर्टवर शेअर केली आहे. या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तीन लाखाहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केलं आहे. अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने दत्तात्रयला ‘सलाम’ केला आहे. एक युजरने म्हटलंय ‘भावा मी तुला ओळखत नाही, पण तू जे केलंस त्याला तोड नाही, खुप-खुप शुभेच्छा’