१४७ व्या श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन.
१३ एप्रिल पासून धर्मसंकीर्तन व श्री.स्वामी पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात.

१४७ व्या श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन.
दि.१३ एप्रिल पासून धर्मसंकीर्तन व श्री.स्वामी पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात.
दि.२६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस.
धर्मसंकीर्तन महोत्सवात विख्यात कलाकारांची उपस्थिती.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, )
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४७ वा पुण्यतिथी दिनांक २६ एप्रिल रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक १३ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल अखेर धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास जगदविख्यात कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
या पुण्यतिथी महोत्सवात प्रत्येक दिवशी पहाटे ४ वा.नगरप्रदक्षिणा, ५ वाजता काकड आरती, दिनांक १९ एप्रिल पासून वीणा सप्ताह, सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ८ ते ११ या वेळेत देवस्थान विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली दिनांक १५ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल अखेर श्री गुरुलिलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण होईल. पुण्यातील प्रसिध्द सनई वादक दिनेश मावडीकर हे उत्सव कालावधीत पहाटे ४ वाजता व सायंकाळी ७ वाजता सनई चौघडा वादन करतील. प्रतिदिनी दुपारी १२ ते ४ या वेळेत भजन सेवा संयोजक यांच्या अधिपत्त्याखाली भजनी मंडळांची भजनसेवा स्वामींच्या चरणी रुजू होईल. धर्मसंकीर्तन महोत्सवात दिनांक १३ एप्रिल रोजी ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर, रा.डोंबीवली यांची किर्तनसेवा, दिनांक १४ एप्रिल रोजी प्रशांत देशपांडे व सहकारी, रा.मुंबई यांची भक्ती संगीतसेवा, दिनांक १५ एप्रिल रोजी आरती मुनिश्वर, रा. डोंबीवली यांची प्रवचनसेवा, तसेच चि. सार्थक बावीकर, रा.सोलापूर यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक १६ एप्रिल रोजी ह.भ.प. रत्नप्रभा सहस्त्रबुध्दे रा.सोलापूर यांची किर्तनसेवा, दिनांक १७ एप्रिल रोजी
श्रीमती तमन्ना नायर – अश्विनी जोशी व सहकलाकार रा.ठाणे यांचा कथ्थक व भरत नाट्यम नृत्याविष्कार, दिनांक १८ एप्रिल रोजी ह.भ.प.कुलदीप साळुंके रा.कारभारवाडी-काेल्हापूर यांची प्रवचन सेवा, तसेच कु.गौरी गंगाजळीवाले रा.पुणे यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक १९ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ह.भ.प.स्वामी चरणाश्रीत गिरीमहाराज (महामंडलेश्वर)
रा.हरिद्वार यांची प्रवचनसेवा, दिनांक २० एप्रिल रोजी योगेश रामदास व सहकारी, रा.बेळगांव यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक २१ एप्रिल रोजी निखील महामुनी व सहकलाकार रा.पुणे यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक २२ एप्रिल रोजी कु.वैष्णवी पवळे व केदार केळकर रा.पुणे यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक २३ एप्रिल रोजी ह.भ.प.संदीप बुवा मांडके रा.पुणे यांची किर्तनसेवा, दिनांक २४ एप्रिल रोजी
गौतमी चिपळूणकर व सहकारी रा.कोल्हापूर यांची भक्ती संगीत सेवा, दिनांक २५ एप्रिल रोजी देविदास जोशी, रा. पुणे यांची प्रवचनसेवा तर पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी रा.धारवाड यांची भक्ती संगीत सेवा इत्यादी धार्मिक कार्यक्रम देवस्थानातील कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे सभा मंडपातील व्यासपीठावर दुपारी ४ ते सायं ७ या वेळेत संपन्न होतील. दिनांक २६ एप्रिल रोजी श्री. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी पहाटे २ ते ४ प्रभातफेरी, पहाटे ४ ते ५ नामस्मरण, पहाटे ५ वा. काकड आरती, यानंतर श्रींचे दर्शन, ११ वाजता महानैवेद्य आरती, दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याचा महानैवेद्य श्रींना अर्पण होईल. दुपारी १२ ते ४ महाप्रसाद, व प्रसाद वाटप होईल. दुपारी २ ते ४ या वेळेत स्वामी भक्त सुहास पाटील यांच्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ महाद्वार कोल्हापूर यांची भजनसेवा संपन्न होईल. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत अक्कलकोट शहरातून श्रींचा सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल. दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत गोपाळकाला होवून श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल अशीही माहिती महेश इंगळे यांनी दिली. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, मनोज जाधव, मनोहर देगांवकर, संजय पवार, श्रीशैल गवंडी, संतोष पराणे, दत्तात्रय नाडगौडा, विपूल जाधव, दीपक जरीपटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
