आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी ,उर्दू कन्नड शाळेत आषाढ एकादशी निमित्ताने ग्रंथ दिंडी,वृक्ष दिंडी व आषाढ वारी दिंडीची कार्यक्रम संपन्न ..
आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम

आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी ,उर्दू कन्नड शाळेत आषाढ एकादशी निमित्ताने ग्रंथ दिंडी,वृक्ष दिंडी व आषाढ वारी दिंडीची कार्यक्रम संपन्न ..

आळगे — दिंडीत विठ्ठल रुक्मिणी यांचे प्रतिमेचे पूजन गावचे ज्येष्ठ नेते श्री महादेव सत्यप्पा पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गड्डेप्पा कोरे , उपाध्यक्ष श्री संतोष चराटे,श्रीशैल माळगे ,मलकणा पाटील, औदुसिद्ध पुजारी, सिद्राम पाटील , संगमेश बिराजदार, सरपंच श्री महातेंश हत्तुरे, उपसरपंच रियाज मुल्ला, या मान्यवरांचे हस्ते पुजा करण्यात आले.
विठ्ठलाच्या वेशात कुमार शुभम संगमेश बिराजदार व रुक्मिणीच्या वेशात स्नेहा मलिकार्जुन स्वामी, वृक्ष दिंडी सौंदर्या संतोष चराटे ,मुक्ताईच्या वेशात प्रतीक्षा गड्डेप्पा कोरे यांच्या समवेत गावात दिंडी काढण्यात आली. वाजत गाजत दिंडी विठ्ठलाच्या गजरात ,तल्लीन झालेली विद्यार्थी , शिक्षक, गावकरी, घरा घरात दारापर्यंत विठ्ठल सक्मिणी ची दर्शन झाले असे गावातील लोकांना झाले.
त्यांनंतर ग्रामपंचायत कार्यालय आणि हनुमान मंदिर समोर रिगण सोहळा आयोजित करण्यात आले.अनेक मुला मुलींनी फुगडी खेळून आपले आनंद व्यक्त केले. रिंगणामध्ये पैसे ठेवून पळण्याची स्पर्धा सुध्दा घेण्यात आले.अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आनंदाने रिंगण सोहळा पार पाडला. या आषाढी दिंडीमध्ये अंगणवाडी सेविका सौ कुलकर्णी मॅडम, स्वामी मॅडम, माळगे मॅडम, काशिनाथ हत्तुरे, सिद्धाराम टाकळे, गौडप्पा अंबलगी , अँड पैंगबर सय्यद शेख, चिकिरेप्पा माळगे हिम्मत कुमठे, श्रीशैल विजापूरे, मलिकार्जुन टाकळे, पिंटु पुजारी, सिद्धाराम गु माळगे, वहिदबाश कुमठे, सुरेश कोळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अखलाख शेख सर, मिळकुंदे सर, गुरुनाथ बिराजदार सर,l गिरीश कोरे सर, शिवशंकर हणमशेट्टी सर, सकलेश्वर पुजारी सर, निंगणा कोळी सर, शिवानंद कोळी सर, सुरज उईके सर, हणमंत पाटील सर, हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्थ ग्रामस्थ मंडळ आळगे यांच्या सहकार्य लाभले. तसेच आजच्या शालेय पोषण आहारात शिरा व मसाला भात असा मेनू होता.
