गावगाथादिन विशेष

13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता.

World Radio Day: एकेकाळी माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन असणाऱ्या रेडिओची कथा...

13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

World Radio Day: एकेकाळी माहिती आणि मनोरंजनाचं शक्तिशाली साधन असणाऱ्या रेडिओची कथा…

HTML img Tag Simply Easy Learning    

World Radio Day : एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग मानला जात होता. कारण, माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. मात्र, आज सर्वत्र नव नवीन माध्यमे आली आणि रेडिओच वाापर कमी झाला. दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. परंतू, टेलिव्हिजन आणि मोबाईलचा शोध लागल्यानंतर रेडिओचा वापर कमी झाला. मात्र, आजूनही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही. जागितक रेडिओ दिनाच्या निमित्ताने त्यासंदर्भातील माहिती…

HTML img Tag Simply Easy Learning    

जगभरातील लोकांना शिक्षित करण्याबरोबरच आजपर्यंत माहितीची देवाणघेवाण आणि रेडिओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच रेडिओ हे पत्रकारांसाठीसुद्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. त्यामुळे 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिन’ म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2013 मध्ये साजरा करण्यात आला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

रेडिओ म्हणजे काय?

HTML img Tag Simply Easy Learning    

रेडिओ म्हणजे एक असे यंत्र, जे विजेचा वापर करून इलेकट्रोमॅग्नेटिक तरंगे ( Wave ) तयार करते, ज्यांच्या द्वारे संदेशाची देवाण घेवाण केली जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवणाऱ्या रेडिओ ला ट्रान्समीटर तर तरंगे म्हणजेच वेव्ह स्वीकारून त्याचे रूपांतर आवाजात करणाऱ्या रेडिओ ला Receiver असे म्हटले जाते. रेडिओ 300 Hz इतक्या क्षमतेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करू शकते.

जगातला पहिला रोडिओ इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बनवला. 1895 मध्ये त्यांनी रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंटही मिळवलं. मार्कोनीला ‘फादर ऑफ रेडिओ’ असेही म्हणतात. इंग्रजांनी आणि अनेक युरोपीयन देशांनी हे तंत्रज्ञान आपापल्या वसाहतीत नेलं. याच माध्यमातून अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला. त्या काळी हे माध्यम प्रामुख्यानं कम्युनिकेशनसाठी वापरलं जात होतं. विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी रेडिओचा वापर होऊ लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणाला. 23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्र सुरु झाली. त्यानंतर 1932 मध्ये भारत सरकारनं भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरु केला. 1936 मध्ये त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ AIR असं ठेवण्यात आला.

दरम्यान, 1920 चे दशक येता येता रेडिओला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले. तसेच 1950 पर्यंत रेडिओ लोकप्रिय झाला होता. भारतातही रेडिओची सुरुवात 1920 च्या दशकात झाली. 23 जुलै 1927 रोजी मुंबईतून रेडिओ प्रसारण सेवा सुरू झाली. तसेच ‘इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनी लिमिटेड’ने मुंबई आणि कोलकता येथे रेडिओ स्टेशन सुरू केले. परंतु 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली. त्यानंतर सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेत त्याला ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टींग सर्विस’ असे नाव दिले. त्यानंतर 8 जून 1936 मध्ये त्यांचे ‘ऑल इंडीया रेडीओ’ असे नामकरण करण्यात आले. तसेच 1956 पुन्हा याचे नाव बदलत ‘आकाशवाणी’ करण्यात आले. हळू हळू आकाशवाणीचे जाळे देशभर पसरू लागले. आज 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह ‘ऑल इंडीया रेडीओ’ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवेपैकी एक बनली आहे. तसेच 2001 मध्ये भारतात खासगी रेडिओ रेडिओ स्टेशनलासुद्धा सुरुवात झाली होती.

रेडिओ हे सर्वात जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. 1945 मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिले प्रसारण झाले होते. त्यामुळे हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. स्पेन रेडिओ अकादमी’ने 2010 मध्ये ‘जागतिक रेडिओ दिवस’ साजरा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर युनेस्कोच्या 67 व्या सत्रात 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाने 14 जानेवारी 2013 रोजी मान्यता दिली. दरवर्षी युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांनाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवरसुद्धा चर्चा केली जाते. यावर्षी जागतिक रेडिओ दिवसाला ‘रेडिओ आणि विविधता’ ही थीम देण्यात आली आहे. तसेच विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संपर्क असे सबथीम सुद्धा देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button