शेळके प्रशालेचे एन.एम. एम. एस परीक्षेत यश ; राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी प्रतीक्षा सुभाष नंदे हिने 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण..
वागदरी येथील श्री एस. एस शेळके प्रशालेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी कुमारी प्रतीक्षा सुभाष नंदे हिने 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण

शेळके प्रशालेचे एन.एम. एम. एस परीक्षेत यश ; राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी प्रतीक्षा सुभाष नंदे हिने 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण..

—————————————-
वागदरी:- शासनातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत वागदरी येथील श्री एस. एस शेळके प्रशालेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी कुमारी प्रतीक्षा सुभाष नंदे हिने 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे व सदर शिष्यवृत्तीसाठी ती पात्र ठरली आहे.प्रतीक्षाच्या या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक श्री मल्लिनाथ शेळके सावकार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी संचालक डॉ शरणकुमार वरनाळे, प्राचार्य अनिल देशमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर विद्यार्थीनीस स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री प्रदीप पाटील सर ,सौ शैलशिल्पा जाधव,शिवशरण गवंडी, मल्लिकार्जुन देशमुख,इमामकासीम बागवान,श्रीशैल वाघमोडे, मीनाक्षी माळकुंजे,राजश्री शेळके,राजश्री मुनोळी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराज शेळके सावकार ,प्राचार्य अनील देशमुख, पर्यवेक्षिका सौ शैलशिल्पा जाधव ,सर्व संचालक वर्ग व ग्रामस्थांनी केले.

फोटोखालील ओळ- कुमारी प्रतीक्षा नंदे हिचा सत्कार करताना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री मल्लिनाथ शेळके, संचालक डॉ शरणकुमार वरनाळे, प्राचार्य अनिल देशमुख,पर्यवेक्षिका सौ शैलशिल्पा जाधव
