मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल घोषित
उल्लेखनीय अंक म्हणून गावगाथा सोलापूर निवड

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल घोषित

१९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखक चळवळीचे अमृतमहोत्सव वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक २०२२ स्पर्धेचा निकाल संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केला आहे.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय – धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान – गोरेगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव या कार्यक्रमात रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय येथे पारितोषिक वितरण होणार आहे. ग्रंथालय चळवळीतील दिवंगत जेष्ठ कार्यकर्ते आणि दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ‘वाचन चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार’ श्री प्रदीप कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ सी रामाणी, सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित, उद्योजक शंकरशेठ माटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

दिवाळी अंकाबरोबरच शाखाप्रमुख संजय भगत पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. असे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि ऍड देवदत्त लाड यांनी सांगितले आहे.

दिवाळी अंक स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे आहे –

मनोरंजनकार’ का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – महाराष्ट्र टाइम्स, मुंबई (संपादक – पराग करंदीकर )
चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – सकाळ अवतरण, मुंबई (संपादक – राहुल गडपाले), पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – मुक्त आनंदघन, मुंबई (संपादक – डॉ देविदास पोटे ), पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – गोवन वार्ता, गोवा (संपादक – पांडुरंग गावकर ), पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – कालनिर्णय, मुंबई ( संपादक – जयराज साळगावकर),साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक – अधोरेखित, पालघर (संपादक – डॉ पल्लवी परुळेकर बनसोडे ), मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – मनशक्ती, लोणावळा (संपादक – डॉ वर्षा तोडमल )कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक – श्रमकल्याण युग, मुंबई (संपादक – रविराज इळवे )
याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार – नाशिक (स्वानंद बेदरकर), नवरंग रुपेरी – औरंगाबाद (अशोक उजंळबकर ), कनक रंगवाचा – सिंधुदुर्ग ( वामन पंडित ), पुरुष स्पंदनं – मुंबई ( हरीश सदानी ), शब्दगांधार – पुणे ( डॉ अरविंद नेरकर ), समदा – पुणे (मनस्विनी प्रभुणे नायक), सह्याचल – परभणी (अनघा काटकर), ठाणे नागरिक – ठाणे (सतिषकुमार भावे)
त्याचप्रमाणे उल्लेखनीय अंक म्हणून – संस्कार भक्तिधारा – पुणे ( कांचन सातपुते ), क्रीककथा – पुणे ( कौस्तुभ चाटे ), कालतरंग – पालघर ( संदीप मुकणे ), शैव प्रबोधन – मुंबई ( सौ संपदा गुरव ), धगधगती मुंबई – मुंबई ( भिमराव धुळप ), निशांत – अहमदनगर ( निशांत दातीर ), सत्यवेध – सांगली ( राहुल कुलकर्णी ), गावगाथा – सोलापूर ( धोंडप्पा नंदे ), नवरंग रुपेरी (औरंगाबाद)
परीक्षक म्हणून सुनील सुर्वे (ग्रंथालय प्रमुख – केळकर कॉलेज), दत्ता मालप (प्रत्युष जाहिरात कंपनीचे प्रमुख) यांनी काम पाहिले.