मुक्ती व अन्वी श्रीच्या कथ्थकने वटवृक्ष मंदिरात दरवळला पदन्यासाचा स्वराविष्कार
कथ्थकच्या नृत्याविष्काराने गुंफले धर्मसंकीर्तनाचे दुसरे पुष्प

मुक्ती व अन्वी श्रीच्या कथ्थकने वटवृक्ष मंदिरात दरवळला पदन्यासाचा स्वराविष्कार

कथ्थकच्या नृत्याविष्काराने गुंफले धर्मसंकीर्तनाचे दुसरे पुष्प

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/४/२३) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवात आज
पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य
हैद्राबाद येथील मुक्ती व अन्वी श्रीं च्या
कथ्थक नृत्याने वटवृक्ष मंदिरात भक्तीचा सुगंध दरवळून धर्म संकीर्तनाचे दुसरे पुष्प भक्तीभावाने गुंफले गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्ती व अन्वी श्री यांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपा वस्त्र, प्रसाद देऊन सत्कार केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. मुक्ती व अन्वी श्री यांच्या कथ्थक नृत्याविष्काराने नृत्य भक्तीचा आनंदही भाविकांना अनुभवता आला. या कथ्थक सेवेत मुक्ती व अन्वी श्री यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याने उपस्थित भाविकांच्या हृदयाचा ठाव घेतला. कथ्थक नृत्यातील पदन्यास, रूमक, तीन ताल, सवाल जवाब, रूपक चक्कर यासह अनेक बंदिशी सादर करून कथ्थकातील विवीध दाखले देत नृत्यांगनाचे नजराणे सादर केले. या कथ्थकच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात एक आनंदाचा नृत्योत्सव होवून भक्तीयुक्त सुगंध दरवळत स्वामी कृपेची साक्ष प्रतीत होत आहे इतकं सुंदर सादरीकरण करून मुक्ती व अन्वी श्री यांनी अतिशय तन्मयतेने स्वामी चरणी नृत्याविष्कार अर्पण केलं. या विविधरंगी कथ्थक नृत्यमुळे उपस्थित भाविकही अत्यंत मनापासून या नृत्य सेवेचा लाभ घेतले. या नृत्य सेवेत मुक्ती व अन्वी श्री यांना तबल्यावर आशय कुलकर्णी, हार्मोनियमवर, अजीत बिच्छू, पखवाजवर कृष्णा साळुंखे, गायनावर शुभम खंडाळकर
आदी सहकाऱ्यांनी साथ-संगत केली.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, प्रा.नागनाथ जेऊरे, मनोहर देगांवकर, मयुर स्वामी, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, भिमराव भोसेकर, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, प्रसाद पाटील, श्रीशैल गवंडी, सचिन हन्नूरे, महेश मस्कले, मनोज जाधव, प्रसाद सोनार, मनोज काळे, संजय पवार, मोहन शिंदे, बंडेराव घाटगे, नरसिंग क्षीरसागर, संजय बडवे, चंद्रकांत गवंडी, संतोष जमगे, अरविंद कोकाटे, रवी मलवे, श्रीकांत मलवे, विपुल जाधव आदींसह मोठया संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – कथ्थक नृत्य सादर करताना मुक्ती व अन्वी श्री दिसत आहेत.
