Solapur: सोलापूरात ११ ऑगस्टला ‘गडीनाडू कन्नड साहित्यिक सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

अक्कलकोट : (प्रतिनिधी) : कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बंगळुरू, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा कन्नड संघ-संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात 11 ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्त ‘गडीनाडू कन्नड साहित्यिक सांस्कृतिक महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आदर्श कन्नड बळग महाराष्ट्राचे अध्यक्ष मलिकजान शेख यांनी सांगितले.


सोलापूर येथील सत्यविजय सभाभवन येथे 11 ऑगस्ट रोजी ‘गडीनाडू कन्नड साहित्य सांस्कृतिक महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी 9.30 वा. बसवारुढ मठाचे परमपूज्य सद्गुरू शिवपुत्र महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व माजी नगरसेवक रमेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली रेवणसिद्ध शिवशरण सेवा संघाचे अध्यक्ष परमेश्वर कंचे यांनी विविध कला पथकांद्वारे भुवनेश्वरी देवीची मिरवणूकिला चालना देणार आहे.


सकाळी 10 वा. नागणसुर विरक्तमठाचे परमपूज्य डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी आणि स्वस्तपुर शाखा मठाचे परमपूज्य डॉ. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या सानिध्यात कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमण्णा बेवीनमरद यांच्या अध्यक्षतेखाली खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गडिनाडू पुरस्कार प्रदान तर आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्मरण संचिकाचे लोकार्पण करणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते भुवनेश्वरी प्रतिमेचे पूजन होणार आहे. कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मत्तीहळ्ळी यांनी प्रास्ताविक भाषण करणार आहे.
दुपारी 12 वाजता अक्कलकोट विरक्तमठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या सानिध्यात परिसंवाद कार्यक्रम होणार आहे, कन्नड साहित्य अकाडमीचे सदस्य डॉ. सिद्धराम होनकल यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्राच्या विकासात कन्नड-कन्नडीगांची भूमिका’ या विषयावर कलबुर्गीचे साहित्यिक श्रीशैल नागराळ, ‘कन्नड-मराठी साहित्य-संस्कृती सामरस्य’ या विषयावर बिदर जिल्ह्यातील साहित्यिक डॉ. गविसिद्धप्पा पाटील आणि ‘सीमे पालिकडचे शरण संप्रदाय’ या विषयावरील साहित्यिक डॉ.राजकुमार हिरेमठ यांचे व्याख्यान होणार आहे.
दुपारी 2 वा. कलबुर्गीचे साहित्यिक डॉ. प्रभुलिंग निलूरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहुभाषिक काव्य वाचन’ होणार असून, दुपारी 3.30 वा. चर्चा – महाराष्ट्रातील सीमावर्ती कन्नडिगांच्या दर्जासह असे एकूण 3 मैफिली होणार आहेत. सायंकाळी 5.30 वा. मुगळी बसवमंठपाचे परमपूज्य महानंदाताई हिरेमठ यांचे समारोपाचे भाषणाने कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या पत्रकार परिषदेत आदर्श कन्नड बळगचे उपाध्यक्ष राजशेखर उमराणिकर, बसवराज धनशेट्टी, शरणप्पा फुलारी, महेश मेत्री, विद्याधर गुरुव, गिरीष जकापुरे, प्रशांत बिराजदार, गुरुराज मठपती, अमसिद्ध यादवाड यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
समारंभास उपस्थित राहणारे प्रमुख पाहुणे :
सिद्धरामेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे, जि.प. माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जि.प. माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, उद्योजक महादेव कोगनुरे, अश्विनी हॉस्पिटलचे प्रमुख किरण जामगोंडा, शिवसेना नेते अमर पाटील, भाजपचे उदय पाटील, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तुरगावकर, इरप्पा सालक्की, महांतेश कवलगी, सिद्धेश्वर जोकारे, शरणबसप्पा खेडगी, किरण पुजारी आदी. सहभागी होणार आहेत.
कर्नाटक बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी बंगळुरू, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा कन्नड संघ-संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात 11 ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘गडीनाडू कन्नड साहित्यिक सांस्कृतिक महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह चाहत्यांनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा.
-सोमशेखर जमशेट्टी
अध्यक्ष, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र