गावगाथा

IPS अधिकारी संदिप भाजीभाकरे यांच्या घरातील हजारो पुस्ताकाचा ग्रंथालय प्रेरणादायी — सुधीर सोनकवडे

वाचकप्रिय पुस्तक प्रेमी अधिकारी

IPS अधिकारी संदिप भाजीभाकरे यांच्या घरातील हजारो पुस्ताकाचा ग्रंथालय प्रेरणादायी — सुधीर सोनकवडे 

सोलापूर — जिथे नाही पुस्तकाचे कपाट ते घर होईल भुईसपाट, असे म्हटले जाते.परंतु सध्या सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला असून लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत पुस्तके वाचण्याचे प्रमाण घटले असल्याचे चित्र आहे. याला कारण म्हणजे सध्या इंटरनेट, मोबाईलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. त्यामुळे वाचाल तर वाचाल, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पण असे काही पुस्तकं वेडे, पुस्तक प्रेमी,वाचक असतात आताच्या स्मार्ट मोबाईल जमान्यात सुध्दा पुस्तके वाचण्यात मग्न असतात.
सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सध्या मुंबई येथील पश्चिम रेल्वेत पोलिस उपायुक्त पदावर असलेले संदिप भाजीभाकरे साहेब यांनी असेच आगळें वेगळे इतरांना प्रेरणा मिळेल असे आपल्या घरात स्वतंत्र हजारो पुस्ताकाचे ग्रंथालय उभे केले आहे. सुट्टी च्या दिवशी फक्त पुस्तक वाचणे हाच दिनक्रम असतो.विविध प्रकारांचे हजारो पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.
मा.संदिप भाजीभाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख आहे म्हणजे कधी काळी दुष्काळी पट्टा असा कायमस्वरुपी शिक्का लागलेल्या उपळाई बुद्रुकची ओळख आता स्पर्धा परीक्षेची पंढरी अशीच बनली आहे. या गावात ३ आयएएस, १ आयआरएस व १ आयपीएस असे प्रशासनातील उच्च अधिकारी आहेत. शिवाय ५० हून अधिक जण अधिकारी बनले आहेत. माढा शेटफळ रस्त्यावर नऊ हजार लोकसंख्या असलेले उपळाई बुद्रुक हे गाव आहे. युवकांच्या सनदी अधिकारी’ होण्याच्या प्रवासात यशात मोठा वाटा आहे, तो गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा अन् रयत शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालयाचा.स्पर्धा परीक्षांची पंढरी म्हणून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावची ओळख आता राज्याच्या प्रशासनात बनली आहे. या गावात प्रशासनातील उच्चपदस्थ अशा तब्बल ५० अधिकाऱ्यांचं घर आहे. गावाने प्रशासनातील अधिकाऱ्याचं अर्धशतक झळकावलं असून यात महिला आयएसएस अधिकारी रोहिणी भाजीभाकरे याही याच गावच्या कन्या आहेत. तर, त्यांचे बंधु संदीप भाजीभाकरे हेही आयपीएस आहेत. त्यामुळे, या गावच्या मातीची गोष्टच निराळी आहे. प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी व परिश्रम हे उपळाईतील युवकांच्या यशाचे गमक आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करत गावातील युवकांनी यश संपादन केले आहे. अधिकारी झालेल्या युवकांची नागरिक गावातून मिरवणूक काढतात. त्यातून इतरांना प्रेरणा मिळत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेतील उपळाईच्या यशाचा झेंडा युवकांनी कायम ठेवला आहे.
मा.संदिप भाजीभाकरे साहेब यांची ग्रंथसंपदा थक्क करणारी आहे. वागदरी चे स्वातंत्रवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व तिर्थ प्रशालेचे प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी भाजीभाकरे साहेब यांच्या घरातील ग्रंथालयास भेट दिली यावेळी राजकुमार निरोळी, वागदरीचे माजी सरपंच रवी वरनाळे,सिध्दू कोळी, संतोष मडिवाळ व सायबू गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button