गावगाथा

मोलमजुरी करून खाणारे सातनदुधनी चे गणपती हणमंत कोळी यांनी दिली समजासाठी स्वतःची जमीन दान

सामाजिक बांधिलकी

मोलमजुरी करून खाणारे सातनदुधनी चे गणपती हणमंत कोळी यांनी दिली समजासाठी स्वतःची जमीन दान

अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथील कोळी समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती गणपती हणमंत कोळी‌ यांनी गावचे आराध्य दैवत जयदुर्गादेवी कोळी समाजासाठी स्वतःची जमीन रितसर नावाने करून दान दिली आहेत. मालमत्ता क्रमांक १०३ मालमत्तेचे वर्णन पु.प २० उ.द१६ अशी त्याचा मालमत्ता क्रमांक आहे. त्यांनी अनेक वर्षापासून कोळी समाजासाठी सामाजिक सांस्कृतिक कामांमध्ये सहभागी होऊन आपला समाज मागे राहू नये म्हणून स्वतःची जागा कोळी समाजासाठी दिलेले आहेत. गणपती हणमंतु कोळी यांच्या या दात्रत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात असुन अभिनंदन केले जात आहे. कोळी समाजाकडून ठिकठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. त्यांनी अनेक वर्षापासून कोळी समाजाच्या अडचणी पाहून स्वतःच्या मालकीची जागा त्यांनी समाजासाठी दान देऊन समाजाच्या नावाने उतारा करून ही जागा माझी नाही समाजाची आहे अशी त्यांनी ग्वाही दिली, समाजाला त्यांनी पूर्णतः जागा अर्पण केले आहेत. यावेळी त्यांचें कोळी समाजाकडून अभिनंदन ही करण्यात आले, गणपती कोळी हे कोळी समाजातील अतिशय सर्वसामान्य व्यक्ती असून जय दुर्गादेवी सामजिक संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र कोळी यांचे ते वडील आहेत. ते पुर्वी पासूनच सामाजिक कार्यात आवड असलेले व्यक्ती आहेत. वडिलांची समाजसेवा करण्याची आवड असल्यामुळे त्यांचा मुलगा देवेंद्र कोळी यांनीही वडिलांकडे मागणी केली की समाजासाठी आपण काहीतरी देणे आहोत त्यासाठी आपण समाजाला आपली थोडी जमीन दान देऊ. जमीन अर्पण करण्याचा निर्णय वडिलांशी चर्चा करून घेतल्यावर त्यांनी समाजासाठी ही जागा दिली आहेत. शुक्रवार‌ दिनांक 1 मार्च 24 रोजी समाजांला माझ्या जमिनीचा उतारा समाजाचे नावाने झाला आहे असे गणपती कोळी यांनी जाहिर केले. गणपती कोळी यांनी वयाच्या 72 व्या वर्षी कोळी समाजासाठी आवड निर्माण करून कोळी समाजाला माझी एक आठवण असावी म्हणुन सत्तर वर्ष मूलमजुरी करून गरीबी मधुन संसार उभा करून समाजासाठी स्वतःची जागा दान दिले आहेत. आता सध्या देखील ते दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीचे काम करून आपल्या संसाराचे पोट भरून घेत आहेत अशा परिस्थितीत त्यांनी समाजासाठी जागा दिलेली आहे, ही फार मोठी आणि श्रीमंताच्या आणि धन दांडग्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button