ग्रामीण लोकनाट्य

अक्कलकोट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ.

१४_मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केल्याची माहिती आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट दि,१४_मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केल्याची माहिती आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्या गौरी दातार ह्या होत्या.सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये या मध्ये सहभागी होणार आहेत.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आले. पंधरवड्याचे समारोप कानडी शाळेत करण्यात येणार असल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद,महाराष्ट्र यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.कानडी सीमावरती भागात मराठी जनजागृतीचे यंदाची तपपूर्ती वर्ष आहे.
दरवर्षी २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.हा पंधरवडा हि मराठी भाषा दिना चे अवचित्य साधून आयोजित केला आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरु झाल्याची माहिती अक्कलकोट चे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली.पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनीही मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. पसायदानाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. समारोप पुलवामा
हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

……..

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button