भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय – मा.आमदार बबनदादा शिंदे
मा.आमदार बबनदादा शिंदे यांचा वटवृक्ष मंदिरात सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय – मा.आमदार बबनदादा शिंदे

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ३/१/२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून या सह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी बबनदादा शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीच्या विवीध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना मा.आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, सुरेश सूर्यवंशी, मोरे बंधू, श्रीशैल गवंडी, डॉ.निखिल पुजारी, प्रा.सचिन पुजारी, अमोल येवले, निशांत काळे, प्रसाद सोनार, सचिन जाधव, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

- फोटो ओळ – मा.आमदार बबनदादा शिंदे यांचा वटवृक्ष मंदिरात सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.