कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वतीने १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन- प्रा.नागनाथ जेऊरे
लोकापूरे मल्टीपर्पज हॉलमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वतीने
१० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार सोहळ्याचे आयोजन- प्रा.नागनाथ जेऊरे

लोकापूरे मल्टीपर्पज हॉलमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.११/६/२०२४) – येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने गुरूवार दिनांक १३ जून रोजी सकाळी १० वाजता दहावी व बारावी मधील गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आल्याची माहिती कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी दिली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी अक्कलकोट तालुक्यात गेल्या १४ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविण्यामध्ये अग्रेसर असलेल्या व तालुक्यातील एकमेव तथा एन.बी.ए. मानांकन असलेल्या कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.
१० वी, व १२ वी मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशिष्ट सत्कार सोहळा याप्रसंगी संपन्न होणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत / अभ्यासात (शिक्षणात) आवड निर्माण व्हावी, यासाठी मार्गदर्शन शिबीर (करीअर गाईडन्स) याचेही आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबिर घेण्याचे एकमेव मुख्य उद्देश एवढेच आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळावी व ते भविष्यात चांगल्या पदवीवर कार्य करीत देशाचे उज्वल भविष्य घडवावे याकरिता हे करिअर मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते मा. राहुल गिरी (सर) यांचे प्रमुख मागदर्शन लाभणार आहे, तरी तालुक्यातील १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी तसेच पालकांनी जास्तीत जास्त संख्येने या विशिष्ट मार्गदर्शन सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे सर यांनी केले आहे.
