अक्कलकोट शहरातील विविध मारुती मंदिरात श्री हनुमान जयंती निमित्त विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न, मा.मिलन कल्याणशेट्टी हे देखील उपस्थित
हनुमान जन्मोत्सव सोहळा

अक्कलकोट शहरातील विविध मारुती मंदिरात श्री हनुमान जयंती निमित्त विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न, मा.मिलन कल्याणशेट्टी हे देखील उपस्थित
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील विविध मारुती मंदिरात श्री हनुमान जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न झाल्या. त्यांच्या समवेत नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी हे देखील उपस्थित होते.*
शहरातील सोन्या मारुती, मधला मारुती, येथील मंदिरात अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पूजा संपन्न होऊन महाप्रसादाचा संकल्प सोडण्यात आला. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. श्री हनुमान जयंती उत्सव समितीकडून अमोलराजे भोसले व मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
याबरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरीचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त टिळक गल्लीतील मानाच्या पहिल्या काठीचे मानकरी पाटील परिवार यांच्या घरी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भेट देऊन नंदी ध्वजाचे दर्शन व महाप्रसाद घेतले.
या कार्यक्रमास सोन्या मारुती जयंती उत्सवाची स्वप्नील अगरखेड, अभिजित सूर्यवंशी, श्री गुरव, श्रीकांत झिपरे, आकाश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, ओंकार दुर्गकर तर मधला मारुती येथे राजाभाऊ नवले, प्रा.विजयकुमार लिंबीतोटे, प्रा.शरणप्पा अचलेर, स्वामीराव मोरे, आकशा शिंदे, प्रकाश मांढरे, सुनील लिंबीतोटे, प्रशांत मांढरे, संतोष फडणीस, अक्षय लिंबीतोटे, रवी बिराजदार, महेश लिंबीतोटे व यांच्यासह मनोज निकम, अभियंता अशोक येणगुरे, नन्नु कोरबू, निखील पाटील, अप्पासाहेब पाटील, सौरभ मोरे, प्रवीण घाडगे, गोटू माने, राहुल इंडे हे उपस्थित होते.