गावगाथा

हनुमान जन्मोत्सवनिमित्त लाखो भक्त झाले मारूती चरणी लिन : महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,आंध्र प्रदेशसह देशभरातुन आलेल्या भक्तांची गौडगाव येथे गर्दी

७५ जणांनी केले रक्तदान,ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न

हनुमान जन्मोत्सवनिमित्त लाखो भक्त झाले मारूती चरणी लिन : महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,आंध्र प्रदेशसह देशभरातुन आलेल्या भक्तांची गौडगाव येथे गर्दी

७५ जणांनी केले रक्तदान,ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न 

अक्कलकोट,प्रतिनिधी
गौडगांव (ता. अक्कलकोट)येथील भाविकांचे श्रद्धास्थान दक्षिणमुखी श्री जागृत मारूती मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तिभावाने साजरी करण्यात आले.रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमान की,जय,जय बजरंग अशा विविध घोषणा देत लाखो भक्त मारूती चरणी लिन झाले.
जन्मोत्सवनिमित्त मंगळवारी पहाटे मारूतीस महाभिषेक,होमहवन,यज्ञ,रुद्राभिषेक,महाआरतीसह विविध पुजा पार पडली.मारुतीचा जन्म आणि जन्मोत्सव मंगळवार हा दुर्मिळयोग भाविकांना प्रसन्न करणारा होता.याचा लाभ उपस्थित सर्व भाविकांनी घेतले.तसेच मारुती मंदिरातील गजलक्ष्मी व नवग्रह पूजेचा लाभ भाविकांना मिळाले.गाभारा व मूर्तीस फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती.पहाटे पासुन अभिषेकाला प्रारंभ झाला.शेकडो भाविकांच्या साक्षीने गुलाल व पुष्पवृष्टी करत पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मारूती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट,मंदिरा बाहेरही आकर्षक विद्दुत रोशनाई भक्तांना आकर्षक
ठरत होती.


सिद्धार्थ आर्ट सोलापूर येथील चित्रकारांनी रामायणातील घटनांचे चित्ररूपाने सुंदर प्रकरण केले होते.ते भक्तासाठी सेल्फी पॉईंट ठरले.अनेकांनी सेल्फी घेण्यासाठी मग्न झाले होते.महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,केरळ कर्नाटक राज्यासह देशभरातून आलेले लाखो भाविकांना मारूतीचे दर्शन घेऊन प्रश्न झाले.भक्तांना सुलभ व शांततेत दर्शन घेता यावे म्हणुन मंदीर समितीच्या वतीने नेटके नियोजन करण्यात केले होते.
ढोल ताशाच्या गजरात१०वाजता पालखी निघाली.शेकडो भाविक सहभागी झाले होते.त्यावेळी गुलाल,पुष्पवृष्टी व हनुमान चालीसा,मंत्रमंठण करून मंदीर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केले.अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात व फटाक्यांच्या अतिषबाजीत पालखी मिरवणुक पार पडली.उन्हाचे चटके,घामाच्या धारोळ्यात व वादळे वाऱ्याचे परवा न करता आयुष्यातले सगळे दु:ख व ताणतणाव विसरून भक्त मारूती चरणी लीन झाले.नवस केलेल्या भक्तांनी
जन्मोत्सवनिमित्त नवस पुर्ण करत होते.पेढे,बुंदी लाडू वाटप करत होते तर साखर,गहू,तांदूळ,रवा,
गुळ, तेल अनेक खाद्य वस्तू मंदिरात आणून देत होते.
मारूती भक्त निसार चांद शेख यांनी गौडगाव मारुती अन्नछत्र मंडळात अन्नदानाच्या स्वरूपात
महाप्रसादाची सोय केली होती.यावेळी लोखो भाविक भक्तांनी महाप्रसाद घेऊन तृप्त झाले.सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी मध्यरात्रीपर्यंत कायम होती.दुपार बाराची काकड आरतीचा लाभ सोलापुर येथील रंजना शिरसट यांना मिळाला.डॉ.हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने हनुमान जन्मोत्सवनिमित्त रक्तदानाचे आयोजन केले होते.त्याप्रसंगी दिवसभरात ७५ जणांनी रक्तदान केले.तसेच दिवसभर अनेक विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, कार्याध्यक्ष सिद्राम वाघमोडे,प्रकाश मेंथे,ज्ञानेश्वर फुलारी,चौडप्पा सोलापुरे,बिराप्पा पुजारी,शांतया स्वामी,परमेश्वर सुतार,प्रकाश सनकळ,आमसिद्ध कोरे, श्रीमंत सवळतोट, श्रीमंत म्हेत्रे, भारत ननवरे,अजु माने शिवानंद सोलापरे शिवशंकर फुलारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button