
भैरवनाथ शुगर चषकचा मानकरी ठरला पुणे पोलीस संघ

मंत्री प्राचार्य डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

पंढरपूर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राचार्य डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या भैरवनाथ शुगर चषकच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पंढरपूरच्या वीर सावरकर क्रिकेट संघाचा पराभव करून पुणे पोलीस संघ विजयी ठरला आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्या जिंकणाऱ्या पुणे पोलीस संघाला गुरुराज ठिगळे यांचे वतीने पाहिले बक्षीस एक लाख रुपये तर द्वितीय बक्षीस श्री कुलकर्णी श्री रवींद्र साळुंखे श्री कृष्णदेव लोंढे यांच्या वतीने पन्नास हजार चे वीर सावरकर क्रिकेट संघाने मिळवले तिसरे ढवळस व आदर्श कॉम्पुटर क्रिकेट क्लब सातारा यांना जिल्हा प्रमुख श्री महावीर नाना देशमुख तालुका अध्यक्ष श्री शिवाजी बाबर यांच्या वतीने 25000 बक्षीस विभागून देण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज प्रशांत गायकवाड, गोलंदाज अथर्व देशमाने ठरले. यांना मुन्ना भोसले व नागेश भोसले यांच्या वतीने 5000 रुपये देण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी माजी आ. प्रशांतराव परिचारक, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना प्राचार्य शिवाजीराव सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, प्रांताधिकारी गजानन गुरव, पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, भैरवनाथ शुगरचे एमडी रवींद्र साळुंखे, शिवम असोसिएटचे संचालक गुरुनाथ ठिगळे, भैरवनाथ शुगरचे शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, समाधान जाधव, जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री महावीर नाना देशमुख, तालुका अध्यक्ष शिवाजी बाबर, शहर अध्यक्ष मुन्ना भोसले, युवा सेना शहराध्यक्ष सुमित शिंदे, जिल्हा प्रमुख युवा सेना बालाजी बागल , शाम गोगावं, रामचंद्र जाधव अदित्य फत्तेपूरकर, विनायक संगितराव, नवनाथ रानगट, श्रीनिवास बोरगावकर, सुरज सरवदे, अवधूत बडवे, विश्राम कोतळकर, प्रताप चव्हाण ,संतोष शिरगीरे, संजय नंनवरे, अमोल अटकळे, बशीर शेख, वैभव बडवे, एन आय टी, गणेश जाधव, हेमंत कांबळे उपस्थित होते. संपूर्ण या स्पर्धेचे नियोजन सूत्र संचालन शाम गोगाव सर यांनी केले
