
वागदरी येथे उदा रविवारी श्री परमेश्वर रथोत्सव सोहळा 2023

वागदरी ता. अक्कलकोट येथील श्री परमेश्वर जत्रा मार्च गुढीपाडव्या पासुन प्रारंभ झाल असुन मुख सोहळा उदा रविवारी २६ मार्च रोजी सायंकाळी रथोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २७ रोजी नामांकित पैलवानाचे जंगी कुस्त्या होणार आहे.
सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील वागदरी श्री परमेश्वर जत्रा दि. २२ रोजी गुढीपाडव्या पासुन प्रारंभ झालं आहे . रात्री १२ श्री च्या मूर्तिस महाभिषक संपन्न झाल्यानंतर भक्तगण दंडवत घालुन नवस फेडतात. त्या नंतर दुपारी एक वाजता लहान रथावर कळसारोहण व रात्री ८ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून लहान रथ फिरवितात. सतत पाच दिवस हा कार्यक्रम असतो. दि. २५ रोजी मोठी मदलशी, या दिवशी भक्त गण रात्री ८ पासुन मनोभावे पूजा करून, गावातील भाविक परमेश्वर मंदिरात जमतात व लहान रथ मंदिराजवळ आल्यानंतर गोड पदार्थ, साखर, गुळ, पेढा, लाडू आदी पदार्थ एकमेकांला वाटतात व आनंद साजरा करतात.
दि. २६ रोजी पहाटे ४ वाजता श्री च्या मूर्तिस महाभिषक झाल्यानंतर दुपारी १ वाजता मोठ्या रथावर कळसारोहण संपन्न होतो. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परमेश्वर महाराज की जय, हरहर महादेवाच्या जयघोषात रथोत्सव संपन्न होतो. रात्री उपस्थित भक्तगण च्या करमणुकीसाठी कन्नड सामाजिक नाटक सादर होणार आहे.
दि. २७ रोजी सकाळी ९ पासुन नामांकित पैलवानाचे कुस्त्या संपन्न होणार आहे. कुस्ती खेळण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र, मराठवाडा येथील पैलवानाची हजरी असते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कुस्त्या चालु असतात. प्रेक्षकांना बसुन कुस्त्या पहाता यावा यासाठी सोय देखील आहे. जवळ जवळ १० हजार प्रेक्षकांना कुस्त्या पहाता येणार आहेत.
येणा-या सर्व भक्तांना सतत दोन दिवस महाप्रसादाची सोय करण्यात येणार आहे.अशी माहिती श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट व श्री परमेश्वर रथोत्सव पंच कमिटी तर्फे सांगितले आहे
