अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न
विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा गुरुवारी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वखाली लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात पुरोहित संजय कुलकर्णी, विश्वंभर पुजारी आणि सोमनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी नंतर श्रींच्या प्रकट दिनानिमित्त गुलाल व पाळणा कार्यक्रम न्यासाचे विश्वस्त अर्पिताराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व लाखो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते.

संकल्प व नैवेद्य आरती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अर्पिताराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री व सौ. विशाल मगर यांच्या हस्ते सोडण्यात आले. पाळणा कार्यक्रमाच्या दरम्यान भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, अशोकराव जाधव, वैभव नवले, वैभव मोरे, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, शुभम चव्हाण, अभियंता अमित थोरात, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, विजय माने, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, गोरखनाथ माळी, सुमित कल्याणी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, बाबुशा महिंद्रकर रमेश हेगडे, राजेश काटकर, राजू पवार, गोविंदराव शिंदे, रवी श्रीमान, बलभीम पवार, गणेश लांडगे, धनंजय गडदे, स्वामीराव मोरे, किरण भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
