सायकल स्वारीने अक्कलकोट वारी स्वामी दर्शनाने मन तृप्त
जयसिंगपूर ते अक्कलकोट सायकल प्रवासाने केली स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण.

सायकल स्वारीने अक्कलकोट वारी स्वामी दर्शनाने मन तृप्त

जयसिंगपूर ते अक्कलकोट सायकल प्रवासाने केली स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण.

(अक्कलकोट दिनांक १९/१/२४) – जयसिंगपूर येथील स्वामी भक्तांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून जयसिंगपूर ते अक्कलकोट सायकल स्वारीने अक्कलकोट वारी करून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. याप्रसंगी बोलताना जयसिंगपूर येथील स्वामी भक्तांनी दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ दरबार मध्ये स्वामींना अभिषेक घालून सायकलने चालू केलेला प्रवास आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेमुळे दोन दिवसांमध्ये २४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. सांगोला, मंगळवेढा, सोलापूर मार्गे अक्कलकोटला येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले. आयुष्यात या दिवसाचे चिरंतन स्मरण राहील व सायकल स्वारीने अक्कलकोटला येण्याची जी जिद्द बाळगली होती ती पुढील जीवनात प्रेरक ठरेल असे भावोद्गार व्यक्त केले. तत्पूर्वी सर्व सायकल स्वारीने आलेल्या सर्व स्वामी भक्तांचा मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे
कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, लिपिक प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – जयसिंगपूरहून सायकल स्वारीने आलेल्या स्वामी भक्तांचा देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
