*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्ट्याचे सहा पुरस्कार*
महारष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करीअर कट्टा

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्ट्याचे सहा पुरस्कार*

मुरुम-सुधीर पंचगल्ले
महारष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत २०२३-२४ या वर्षात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सहा पुरस्काराचे वितरण श्री छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा न्यायाधीश वैशाली हांगर्गेकर , माजी प्र-कुलगुरु डॉ अशोक तेजनकर, डॉ सोनाली लोहार, मा. यशवंत शितोळे यांच्या हस्ते देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य व जिल्हा समन्वयक डॉ संजय अस्वले महाविद्यालय समन्वयक डॉ एस पी पसरकले डॉ ए के कटके यांनी स्वीकारले.
श्री छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी अध्यक्षीय भाषणात करीअर कट्टा चे उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून आहेत. त्याचा लाभ सर्व महाविद्यालयांनी घ्यावा असे आवाहन केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उत्कृष्ट विभागीयस्तरीय महाविद्यालय., उत्कृष्ट महाविद्यालय धाराशिव जिल्हा, उत्कृष्ट प्राचार्य म्हणून
डॉ जी एच जाधव, उत्कृष्ट राज्यस्तरीय जिल्हा समन्वयक म्हणून डॉ संजय अस्वले, उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक म्हणून
डॉ एस पी पसरकले आणि डॉ ए के कटके तसेच महाविद्यालयं उत्कृष्ट विद्यार्थी संसद म्हणून मुख्यमंत्री प्रसाद ममाळे, विजय मुळे, वैष्णवी तीगलपले निरंजन कटके सौरभ पाटील अथर्व चाकूरकर आणि सर्व संसद सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभागीय समन्वयक डॉ राजेश लहाने प्रास्ताविक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष डॉ यशवंत शितोळे आणि आभार प्रदर्शन विभागीय समन्वयक डॉ खंदारे सर यांनी केले.
या यशाबद्दल भारत शिक्षण संस्था अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे सरचिटणीस जनार्धन साठे, सचिव पद्माकर हराळकर,सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पी ए पिटले , प्रबंधक राजकुमार सोनवणे कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे
