गावगाथा

*गिरगावच्या वृषाली भद्रेची राष्ट्रीय पंचपदी नियुक्ती*

एक गृहिणी ते राष्ट्रीय महिला पंच असा खडतर प्रवास

*गिरगावच्या वृषाली भद्रेची राष्ट्रीय पंचपदी नियुक्ती*

एक गृहिणी ते राष्ट्रीय महिला पंच असा खडतर प्रवास

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

मुंबई: गिरगावात जन्मा पासून राहणारी वृषाली भद्रे हीची राष्ट्रीय पंच पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यात पार पडलेल्या १३ व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धे दरम्यान भारताचे सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंद डेग्रा यांच्या हस्ते वृषालील ओळख पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ह्या प्रसंगी वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फिजिक स्पोट्स फेडरेशनच सरचिटणीस चेतन पाठारे, इंडियन बॉडी बिलडिंग फेडरेशन सरचिटणीस हिरल सेठ, अर्जुन पुरस्कार विजेते टी.व्ही. पॉली, आयबीबीएफ पंच कमिटी अध्यक्ष अर्सू माऊनगारू ही मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
वृषाली भद्रे हिनी पंजाब येथील लुधियाना शहरात आयबीबीएफ फेडरेशनची पंच परीक्षा दिली होती. तिच्यासह अनेकांनी ह्या परीक्षेत सहभाग घेतला होता.ह्या परीक्षेत वृषालील बी ग्रेड मिळाला असून ईतर स्पर्धकांना मात्र सी ग्रेडवर समाधान मानावे लागले आहे. ह्या पूर्वी वृषालिने तालुका आणि राज्यस्तरीय पांचांचा परीक्षेत देखील चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे.पुढच्या वर्षी परीक्षा देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचाची महिला पंच बनण्याचे स्वप्न वृषालीने अंगी बाळगले आहे. एक गृहिणी ते राष्ट्रीय महिला पंच असा आजवरचा खडतर प्रवास वृषाली अथक परिश्रम घेऊन साध्य केला आहे.ह्या मध्ये तिच्या घरच्या मंडळीनी देखील मोलाची साथ दिली आहे.
वृषालीने आजपर्यंत किंग मास क्लासिक,नवोदित मुंबई श्री, मुंबई युनिव्हर्सिटी २०२४, आमदार श्री खासदार श्री अश्या विवध आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका उतम रित्या पार पडली आहे.२०२३ साली वृषालिने ह्या पेक्षाही अधिक स्पर्धांन पंच म्हणून महत्वाची भूमिका निभावली आहे.महिला राष्ट्रीय पंच ह्या पदा बरोबरच वृषाली एक चांगली क्रीडा आहार तज्ञ आहे. अनेक मोठ मोठ्या खेळाडूंना, नामी हस्तीना आहारा विषयी योग्य सले देत असते.ह्या बरोबरच वृषाली मार्शल आर्ट मध्ये देखील पारंगत असून तिने मुंबईची एक बेस्ट फायटर म्हणून पुरस्कार मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button