
भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा खड्डा तालीमतर्फे जंगी सत्कार
क्रेनने आणला भव्य हार

भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र काळे यांचा खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी क्रेनने मोठा हार आणण्यात आला होता. त्यावर “शहर अध्यक्ष” अशी अक्षरे फुलांनी सजवली होती. त्यावर “कमळ” पक्ष चिन्ह ही लावण्यात आले होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच मिठाई भरवून नूतन शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

माजी नगरसेवक रविसिंह कैय्यावाले,शिवकुमार कामाठी, राजू जमादार, स्टेफन स्वामी,महेश खानोरे, वैभव परदेशी, बाळासाहेब भोसले, संतोष अलदी, संतोष जेडगे, विशाल शिंगे, पवन पुल्ली, विजय म्हेत्रे, महेश तलाटी, सागर भागानगरे, सुमित झंपले, आनंद चौगुले, आकाश कुलकर्णी, मनोज चव्हाण, राजकुमार पाटील, अतिश येळणे, कृष्णा सुरवसे, अमोल गायकवाड, अजय शिंदे, समर्थ गुजले, आकाश बनसोडे आदींसह खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाचे सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
