मुरुम येथील मे. कुबेर फायनान्सचे थाटात उद्घाटन
मे. कुबेर फायनान्सचे उद्घाटन बापूराव पाटील करताना शरण पाटील, धनराज मंगरूळे, गोविंद पाटील व अन्य.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240101-WA0074-780x470.jpg)
मुरुम येथील मे. कुबेर फायनान्सचे थाटात उद्घाटन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. १) रोजी शहरातील नूतन मे. कुबेर फायनान्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, माजी सरपंच गोविंद पाटील, सुर्यकांत पाटील, उमेश सोनकांबळे, प्रमोद कुलकर्णी, माजी सैनिक रूपचंद गायकवाड, हरिश्चंद्र गोडबोले, प्रशांत मुरूमकर, राजू मुल्ला, अनंत गायकवाड, प्रा. आण्णाराव कांबळे, संतोष कांबळे, सिध्देश्वर भालेराव महेंद्र कांबळे, ज्ञानसागर भालेराव आदींचे प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद कांबळे तर आभार सिद्धेश्वर भालेराव यांनी मानले. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथे मे. कुबेर फायनान्सचे उद्घाटन बापूराव पाटील करताना शरण पाटील, धनराज मंगरूळे, गोविंद पाटील व अन्य.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)