
अस्मिता प्रायमरी चा क्रीडा महोत्सव संपन्न

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे


अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक २८ ते ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मान.ए.सी.पी. बी.सी.सोनवणे उप महादेशक एस.आर.पी.एफ.,राजे संभाजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीता

शिंदे,अस्मिता संस्थेचे विश्वस्त म्हात्रे सर, अस्मिताचे प्रमुख लेखापाल श्री. संतोष पालव ,लक्ष्मीबाई वळंजु शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर व पालक डॉक्टर वृषाली रावराणे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.इयत्ता पहिलीसाठी खजिना लुटणे व धावणे, इयत्ता दुसरीसाठी धावणे व नाणी ओळख ,इयत्ता तिसरी व चौथीसाठी धावणे व अडथळा शर्यत तसेच लंगडी या सांघिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांसाठी तोल सांभाळणे तसेच शिक्षकांसाठी चित्र संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला. अस्मिता संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी सर क्रीडा महोत्सवात मुलांचे कौतुक करण्यासाठी व बक्षीस वितरणासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सतोष फडतरे सर, पर्यवेक्षिका गोळे मॅडम, समुपदेशन विभागाचे कर्मचारी, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक कदम सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बालवाडी विभागाचे शिक्षकही उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाला माध्यमिक विभागाचे क्रीडा प्रमुख सावंत सर, माध्यमिक विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी किशोर पणेरीया, माध्यमिक विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.सदर क्रीडा महोत्सव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रचना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
