मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मॉरिशसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
——-
मॉरिशस – छत्रपती शिवाजी महाराज यांचे मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे आज 28 एप्रिलला अनावरण करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे विदेशात लोकापर्ण होणं ही सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला मॉरिसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र भवन मोका मॉरिशस येथे आज सायंकाळी 7:30 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12.5 फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आहेत. साधारण मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकण या भागातील आहे. या सर्वांनी मिळून 1 मे 1960 साली मराठी मंडळी फेडरेशन स्थापन केले आहे. या मंडळींकडून मराठी, परंपरा आणि संस्कृती जपली जाते. मराठी सण देखील येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भातील काही मागण्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. या दौर्यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार आहे.

याशिवाय मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा फडणवीस भेटणार आहेत. यावेळी चर्चा करून काही सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटणार आहेत.
